आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक आणि एसयूव्हीमध्ये भीषण अपघात, राजस्थानच्या डान्सिंग क्वीन हरीशसह 4 जण ठार, 5 जण जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर(राजस्थान) - रविवारी झालेल्या एका अपघातात राजस्थानचे प्रसिद्ध नर्तक हरीश (38 वर्ष)सह चार लोकांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. हरीश आपल्या सात सहकाऱ्यांसह जैसलमेरहून राजस्थानला जात होते. दरम्यान त्यांची एसयूव्ही आणि ट्रकची समोरसमोर धडक झाली. डान्सिंग क्वीन नावाने प्रसिद्ध असलेले हरीश चकरी, भवाई, तराजू, तेरह ताली, घूमर, जरी, कालबेलिया इत्यादी नृत्य प्रकारात पारंगत होते. त्यांनी आतापर्यंत 60 देशांमध्ये कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.  

 

जपानमध्ये 2 हजारपेक्षा जास्त शिष्य
जैसलमेर येथील रहिवासी असलेले हरीश जगभरातील पर्यटकांमध्ये प्रसिद्ध होते. त्यांचे नृत्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने जैसलमेर येथे येत होते. त्यांनी अनेक चित्रपटांत देखील काम केले आहे. याशिवाय हरीशने लोकनृत्य कोरियोग्राफर म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्यांचे जपानमध्ये दोन हजार पेक्षा जास्त शिष्य असल्याचे सांगितले जात आहे. 

 

मुख्यमंत्री गहलोत यांनी व्यक्त केले दुःख
डान्सर क्वीन हरीशच्या निधनाबाबत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दुःख व्यक्त केले आहे. लोककला जोपासणाऱ्या हरीशने आपल्या विशेष शैलीच्या नृत्यामुळे जैसलमेरला वेगळी ओळख दिली. त्यांच्या निधनाने कला क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे गहलोक म्हणाले.