आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाचे बजेट अंतरिमपेक्षा अधिक देणार: जेटली; म्हणाले, अर्थसंकल्पावरून सरकारमध्ये कसलीही घबराट नाही 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- निवडणुकांच्या काळातील परंपरा खंडित करत मोदी सरकार यंदा १ फेब्रुवारीचा अर्थसंकल्प अंतरिम न ठेवता त्यात काही आव्हानाच्या पूर्ततेसह अर्थव्यवस्थेचे हित जोपासणारा अर्थसंकल्प सादर होईल, असे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले. जेटली सध्या उपचारासाठी अमेरिकेत आहेत. तेथे एका वृत्तवाहिनीवर व्हिडिओ कॉंन्फरन्सद्वारे बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. 

 

जेटली म्हणाले, अर्थसंकल्पावरून सरकारमध्ये कसलीही घबराट नाही. आम्हाला आमच्या कामगिरीबाबत पूर्ण विश्वास आहे. असे असले तरी काही बाबी अद्याप चिंताजनक आहेत. सात ते ७.५ टक्के विकास दर समाधानकारक नाही. आपल्याला ८ टक्के विकास दराचा टप्पा पार करायचा आहे. आधारद्वारे होणाऱ्या वार्षिक बचतीतून अनेक योजनांसाठी पैसे मिळू शकतात. यातूनच सरकारला निरुपयोगी योजना बंद करण्यासाठी मदत होऊ शकते. शेतकऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या योजनेबाबत विचारले असता ते म्हणाले, या क्षेत्रात काही आव्हाने आहेत. लोकप्रियता टाळून तर्कसंगत उपक्रम राबवण्याचा सरकारचा विचार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...