आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखम भरण्यासाठी करून पाहा हे तीन उपाय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्याच्या दिवसांत लहानशी जखमही लवकर भरत नाही. जर जखम जास्त खोल असेल तर डॉक्टरांशी संपर्क करा. जखम जास्त खोल नसेल तर ही भरण्यासाठी हे तीन उपाय करा.

1. हळदीचा लेप
हळदेत अॅँटी-बॅक्टेरिअल आिण अॅँटी फंगल गुण असतात जे जखमेतील बॅक्टेरियल इंफेक्शन दूर करतो. याचा लेप लावल्यामुळे जखम लवकर बरी होते. यासाठी हळदेत पाणी मिसळून या पेस्टला जखमेवर लावा. एका तासानंतर कोमट पाण्याने धुवा. याशिवाय हळदीचे दूधदेखील जखम भरण्यास तुमची मदत करेल. हे दूध रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या.

2. पट्टी बांधा
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जखमेवर पट्टी बांधा. जर जखमेवर पट्टी चिटकत असेल तर अगोदर गरम पाणी आणि कापसाने स्वच्छ करून घ्या. जखम स्वच्छ केल्यानंतर यावर पावडर टाका. जेणेकरून जखम वाळेल आिण त्यानंतर औषध लावून पट्टी बांधा. पट्टी करण्यापूर्वी तुमचे हात धुवा आिण शक्य असल्यास गलव्स घालून पट्टी करा. जेणेकरून कोणत्याही प्रकारचे इंफेक्शन होणार नाही.

3.कडुलिंबाच्या पानांचा उपयोग
कडुलिंबाच्या पानामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुण असतात. यामुळे जुन्या आणि खाेल जखमा बऱ्या होण्यास मदत होते. यासाठी कडुलिंबाच्या झाडाच्या सालीला पाण्यामध्ये उकळा आिण कोमट झाल्यावर या पाण्याने जखम स्वच्छ करा. आता कडुलिंबाच्या पानाला मधात मिसळून पेस्ट तयार करा. ही जखमेवर लावा आिण जखम ३ ते ४ तास उघडी ठेवा. ज्यामुळे जखम लवकर बरी होते.

बातम्या आणखी आहेत...