Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | jalana jugar crime news in Marathi

जालना : शेतात जुगार खेळणारे 8 पकडले, 19 जण दुचाकी घटनास्थळी सोडून फरार

प्रतिनिधी | Update - Mar 09, 2019, 10:37 AM IST

तालुक्यातील सामनगाव शिवारात अनेक दिवसांपासून झन्ना मन्ना व तिर्रट नावाचा जुगार दर दोन महिन्यांनी स्थळ बदलून चालत होता.

 • jalana jugar crime news in Marathi

  जालना - तालुक्यातील सामनगाव शिवारात अनेक दिवसांपासून झन्ना मन्ना व तिर्रट नावाचा जुगार दर दोन महिन्यांनी स्थळ बदलून चालत होता. याबाबतची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी मारलेल्या छाप्यात आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. परंतु, १९ जुगारी दुचाकी सोडून फरार झाले. त्यांचा शोध घेतला जात आहे. गुरुवारी रात्री १०.३० ते पहाटे ४.३० अशी सहा तास ही कारवाई चालली.


  सामनगाव शिवारात जगन्नाथ आसाराम नेमाणे याने याच्या शेतात जागा उपलब्ध करून घेऊन रामेश्वर विठ्ठल खैरे (सामनगाव) याने शेतात दोन ठिकाणी शेड तयार केले. तेथे टेबल, खुर्च्या, गाद्या लावून जुगार अड्डा सुरू केला. तेथे झन्ना-मन्ना व तिर्रट नावाचा जुगार खेळला जाऊ लागला. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. या माहितीवरून पथकाने संबंधित ठिकाणी रात्री छापा टाकला असता आनंदा पांडुरंग शिंदे (५४, वरुड), मन्मथ रामभाऊ चौंडे (४४, रेवगाव), राजू सखाराम चव्हाण (४०, नूतन वसाहत जालना), गंगाराम धोंडीराम जाधव (३५, इंदेवाडी), अश्फाक दिलावर देशमुख (३७, सिल्लोड), रामेश्वर उन्नापा दारवाले (५०, राजूर), अशोक जनार्दन पोहेकर (४०, टाकरवन), जगन्नाथ आसाराम नेमाने (३४, सामनगाव) यांना ताब्यात घेतले. तर हा जुगार अड्डा चालवणारा रामेश्वर विठ्ठलराव खैरे हा फरार झाला आहे. आरोपींच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य, रोख, खुर्च्या, टेबल, पाण्याचे जार असा १४ लाख ९८ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आला आहे.


  पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ही कारवाई पीआय गौर, एपीआय जयसिंग परदेशी, शेख रज्जाक, विश्वनाथ भिसे, कैलास कुरेवाड, फुलचंद हजारे, प्रशांत देशमुख, रणजित वैराळ, गाेकुळसिंग कायटे, संजय मगरे, रामेश्वर बघाटे, विनोद गडदे, तुकाराम राठोड, कृष्णा तंगे, हिरामण फलटणकर, मदन बहुरे, सचिन चौधरी, विलास चेके, किरण मोरे, किशोर जाधव, वैभव खोकले, धम्मपाल सुरडकर, सूरज साठे यांनी पार पाडली.


  स्विफ्ट कारमधून जुगाऱ्यांची ने-आण : यातील आरोपी अशोक जनार्दन पोहेकर (टाकरवन) हा जुगाऱ्यांची त्याच्या स्विफ्ट कारमधून ने-आण करीत असल्याची माहिती समोर आली आहे.


  १५ हजार रुपये दिला जात होता महिना : रामेश्वर खैरे हा विविध भागात शेती भाड्याने घेत दोन महिन्यांनी जुगार अड्ड्याची जागा बदलायचा. या जुगारातून तो संबंधित शेत मालकालाही १५ हजार रुपयांपर्यंत भाडे देत होता, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. जुगार अड्ड्याच्या ठिकाणी पाण्याचे जार कुठून येत होते. हे जार कोण आणून द्यायचा, त्याचाही पोलिस शाेध घेत आहेत. या जुगार अड्ड्याला काही जणांकडून अभय असल्याची गोपनीय माहिती आहे. यातील दोन जण रडारवर असल्याचे पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांनी सांगितले.


  पैसे संपले; दुचाकीकडे जाताच पोलिस दिसले
  जुगार खेळत असताना एका जुगाऱ्याचे पैसे संपले म्हणून तो दुचाकी घेऊन गावाकडे जाण्यासाठी दुचाकीजवळ आला. त्याचक्षणी त्याला पोलिस दिसल्याने पोलिस आले, असे म्हणत तो पळू लागला. त्यामुळे इतर सगळे सावध होऊन पळू लागले. परंतु, पोलिसांनी झडप मारून आठ जुगाऱ्यांना पकडले. मात्र बारा जुगारी पळून जाण्यात यशस्वी झाले. परंतु, त्यांच्या दुचाकी पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे.

Trending