आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफिरोजपूर (पंजाब) - मंगळवारी रात्री एका विवाहितेची हत्या करण्यात आली. ती जालंधरची रहिवासी होती. चाकूने भोसकलेला तिचा मृतदेह घरातील बेडमध्ये आढळला. 26 वर्षीय पूजाचा पती मनमोहनने सांगितले, तो एक आयुर्वेदिक कंपनी फिट अँड डाएटमध्ये नोकरी करतो. घरी त्याचे वडील आणि पत्नी पूजा राहतात. वडील एका आठवड्यापूर्वीच हिमाचल प्रदेशला गेले. आईचे पूर्वीच निधन झालेले आहे.
सासू म्हणाली- मुलगी फोन उचलत नव्हती, म्हणून धावतच घरी गेला पती...
मनमोहन म्हणाला- तो दररोज सकाळी विविध शहरांमध्ये मार्केटिंगच्या कामांसाठी जातो. मंगळवारी सकाळीही तो 9.30 वाजता घरातून निघून गेला. त्याचे दिवसभर पत्नीशी बोलणे झाले नव्हते. सासूने पत्नीला दिवसभरात अनेक वेळा कॉल केला परंतु तिने फोन उचलला नाही. दुपारनंतर सासूने फोन करून म्हटले की, पूजा फोन उचलत नाहीये. त्याने ताबडतोब घरी जाऊन पाहावे की, ती कुठे आहे?
किचनची खिडकी कापून मनमोहनने केला प्रवेश
- मनमोहन 6.30 वाजता घरी पोहोचला. बाहेरचे गेट उघडेच होते. घरात प्रवेश करण्याच्या दारावर लॉक लागलेले होते. तो समोरच्या मित्राच्या घरी गेला आणि पूजाबाबत चौकशी केली, परंतु त्यालाही काही माहिती नव्हती. मित्राने त्याला घरी बसवले, म्हणाला- पूजा परत येईपर्यंत तू माझ्या घरी थांब.
- मनमोहन म्हणाला, खूप वेळपर्यंत पूजा आली नाही, तेव्हा त्याने आसपासच्या इतर शेजाऱ्यांना बोलावले आणि घरात जाण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याने किचनच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. पूर्ण घरात शोध घेतल्यानंतर दाराला जोरात धक्का दिल्यावर लॉक तुटले आणि दार उघडले. मग बाहेर येऊन पूजाचा आसपासच्या घरांमध्ये शोध घेऊ लागला.
बेड उघडल्यावर दिसला पूजाचा मृतदेह
खूप वेळ पूजाचा शोध घेतल्यानंतर तिचा काहीच शोध लागला नाही म्हणून घरी येऊन बसला. यादरम्यान एका मित्राने रूममध्ये जाऊन बेड उघडला तेव्हा पूजाचा चाकूने भोसकलेला मृतदेह दिसला. हे पाहताच मित्र ओरडला की, भाई लवकरच ये. शेजाऱ्यांसह अनेक जण रूममध्ये पोहोचले. पूजाच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती आणि हात बांधलेले होते. पत्नीला या अवस्थेत पाहून मनमोहनच्या पायाखालची वाळूच सरकली. त्याने आपल्या मित्रांना फोन करणे सुरू केले. पोलिसांनाही सूचना दिली. कैंट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. फिंगर प्रिंट एक्सपर्टनीही ठशांचे नमुने गोळा केले.
पूजा सकाळी पावणे अकरा वाजता कपडे वाळवण्यासाठी आली होती... किरायेदार
घराच्या तिसऱ्या मजल्यावर राहणारे किरायदार मोहम्मद हासिम रेल्वेमध्ये लोको पायलट आहेत. ते म्हणाले की, पूजा सकाळी पावणे अकरा वाजता छतावर कपडे वाळवण्यासाठी आली होती. यानंतर ती खाली गेली. दुपारी 3.25 वाजता त्याला (हासिमला) व्हॅनच्या ड्रायव्हरचा फोन आला आणि मग तो आपल्या मुलांना घेऊन घरी गेला. त्याने पूजाच्या घराकडे पाहिले नाही.
रात्रभर पोलिसांनी सीसीटीव्ही शोधले...
घटनेची सूचना मिळाल्यानंतर एसपी बलजित सिंह, सीआयए इंचार्ज अवतार सिंह आणि कैंट इंचार्ज जसबीर सिंह घटनास्थळी पोहोचले. पोलिस अधिकाऱ्यांनी प्रत्येक अँगलने तपास केला. फिंगरप्रिंट एक्स्पर्टनी पुरावे गोळा केले. परंतु रात्री 2 वाजेपर्यंत पोलिसांना विवाहितेच्या हत्येबाबत काहीही सुगावा लागला नाही.
दरम्यान, पूजाच्या हत्येमुळे तिचा पती मोठा आक्रोश करताना दिसला. 17 नोव्हेंबरलाच त्यांनी पूजाचा वाढदिवस साजरा केला होता. तो सारखा एवढेच म्हणत होता की, मला न्याय पाहिजे. पूजाच्या मारेकऱ्यांना सर्वात कठोर शिक्षा झाली पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.