आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास याेजना तयार करण्यासाठी जळगाव पालिका नेमणार एजन्सी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव -  जळगाव शहराचा विस्तार व विकास लक्षात घेता विकास याेजना तयार करणे गरजेचे झाले अाहे. परंतु, शासनाकडून युनिट मिळत नसल्याने पालिकेने अाता खासगी तत्वावर याेजना तयार करण्याचा निर्णय घेतला अाहे. यासाठी लवकरच निविदा प्रसिद्ध करून एजन्सीची नियुक्ती करण्यात येणार अाहे. यात जुनी अाणि नवीन विकास याेजना तयार करून घेतली जाणार अाहे. 

सन २०११च्या जनगणनेनुसार जळगाव शहराची लाेकसंख्या सुमारे साडेचार लाख हाेती. परंतु, गेल्या काही वर्षांत जळगाव शहराची लाेकसंख्या साडेपाच लाखांपर्यंत पाेहचली अाहे. वाढती लाेकसंख्या व शहराचा विस्तार लक्षात घेता नागरिकांच्या गरजा लक्षात घेता पालिकेने विकास याेजना तयार करणे गरजेचे झाले अाहे. पालिकेच्या अस्तित्वात असलेल्या जुन्या विकास योजनेची मुदत सन २०१३मध्ये संपली आहे. परंतु, त्यानंतर शासनाला अनेकवेळा पाठपुरावा करूनही महापालिकेला शासनाकडून युनिट मिळू शकलेले नाही. त्यामुळे विकास योजना तयार हाेऊ शकलेली नाही. तसेच महापालिकेची नवीन विकास योजनेची मुदत सन २०२२ मध्ये संपणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आता जुनी व नवीन विकास योजना एकत्रित तयार करण्याच्या तयारीत असून त्या दृष्टीने प्रशासकीय विचारविनिमय तसेच सूचना सुरू झाल्या अाहेत. या सर्व गाेष्टीचा अभ्यास करून याेजना तयार करण्याला वेग येणार अाहे. 

 

२० वर्षांची याेजना संपून ८ वर्ष उलटले : महापालिकेची स्थापना मार्च २००३ मध्ये झाली. त्यापूर्वी तत्कालीन नगरपालिका असताना १९९३मध्ये जळगाव शहराची जुनी विकास योजना (डेव्हलपमेंट प्लान) मंजूर झाली होती. २० वर्षांसाठी तयार केलेली ही याेजना सन २०१३पर्यंत लाेकसंख्या व गरजा लक्षा घेऊन तयार केली हाेती. त्यानंतर नव्याने विकास याेजना तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत. शासनाच्या यंत्रणेकडूनही प्रतिसाद मिळू शकला नाही. मिळालेल्या माहितीनुसार शासनाकडून मिळणारे युनिट हे खासगीच्या तुलनेत अधिक खर्चिक अाहे. त्यामुळे पालिका प्रशासन अाता अापल्या पातळीवर निविदा प्रसिद्ध करून खासगी संस्थेला अर्थात एजन्सी नियुक्त करून त्यांच्याकडून सर्वेक्षणासह विकास योजना तयार करण्याच्या मानसिकतेत अाहे. 

 

एजन्सीमार्फत राबवणार प्रक्रिया 

शहराची जुनी व नवीन विकास याेजना तयार करणे गरजेचे अाहे. यासाठी शहरातील क्रीडांगण, मार्केट, दवाखाना, शाळा, रस्ते अादी मूलभूत गरजांचा विचार करावा लागेल. शहराचा भविष्यातील विकास व विस्तार लक्षात घेता यासंदर्भात एजन्सीमार्फत याेजना तयार करण्याचा विचार सुरू अाहे. निविदा प्रसिद्ध करून प्रक्रिया राबवावी लागेल. -अनंत धामणे, सहायक संचालक, नगररचना विभाग 

 

हद्दवाढीचा निर्णय मनपा महासभेत 
गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव शहराची हद्द वाढवण्याची चर्चा सुरू अाहे. पण ठाेस प्रक्रिया झालेली नाही. सावखेडा व कुसुंबा गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश करावा, असाही सूर अाहे. यासाठी महापालिकेच्या महासभेत ठराव करावा लागणार अाहे. ताे ठराव शासन मान्यतेसाठी पाठवला जाईल. शासन त्यावर हरकती व सूचना मागवेल. त्यानंतर अधिसूचना काढून परवानगी देण्याची प्रक्रिया अाहे. पालिकेची हद्द वाढवण्याचा निर्णय हा सत्ताधारी गटावर अवलंबून असल्याचेही सांगण्यात अाले.  

बातम्या आणखी आहेत...