आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साठवलेल्या कचऱ्याचे विलगीकरण करून खतनिर्मिती, पुनर्प्रक्रिया हाेणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अाव्हाणे शिवारातील महापालिकेच्या मालकीचा डाेकेदुखी ठरलेला घनकचरा प्रकल्प लवकरच कार्यान्वित हाेणार अाहे. गेल्या पाच वर्षांपासून साठवण्यात येणाऱ्या कचऱ्यावर 'बायाे मायनिंग' या शास्त्राेक्त पद्धतीने प्रक्रियेचा मार्ग माेकळा झाला अाहे. पालिकेने घनकचरा व्यवस्थापनाच्या डीपीअारमध्ये सुधारित तांत्रिक मान्यता घेतल्यावर पुढची कार्यवाही सुरू हाेईल. यामुळे अाव्हाणे गावासह निमखेडी व परिसरातील नागरिकांना हाेणाऱ्या त्रासावर इलाज केला जाणार अाहे. 

 

महापालिका क्षेत्रातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी अाव्हाणे शिवारातील सुमारे साडेसहा हेक्टर क्षेत्रात हंजर प्रकल्प उभारला हाेता. केवळ पाच वर्षे प्रकल्प सुरू राहिल्यानंतर मात्र २०१३पासून अचानक बंद पडला अाहे. त्यामुळे शहरातील कचऱ्याची समस्या वाढली अाहे. शहरातून दरराेज २२० मेट्रिक टन कचरा गाेळा केल्यानंतर प्रकल्पस्थळी टाकण्यात येत अाहे. अाता तर प्रकल्पाच्या अावारात जिकडे-तिकडे कचरा दिसताे. 

 

अशी हाेणार प्रक्रिया 
अाव्हाणे शिवारातील घनकचरा प्रकल्पात साठवलेल्या कचऱ्यातील प्लास्टिक, काच, इतर घटक बाहेर काढले जातील. कंपोस्ट होणाऱ्या कचऱ्यापासून खत केले जाईल. अन्य कचऱ्यावर तेथे किंवा बाहेर नेऊन प्रक्रिया केली जाईल. यासाठी स्वतंत्र एजन्सीला काम साेपवले जाण्याची शक्यता अाहे. पालिका प्रशासन बायाे मायनिंगसाठी निविदा प्रसिद्ध करून जबाबदारी साेपवू शकते. यासंदर्भात अद्याप धाेरण स्पष्ट झालेले नाही. 

 

शिफारशींनंतर मान्यता 
शहरातून गाेळा केलेल्या व साठवलेल्या घनकचऱ्यावर शास्त्राेक्त प्रक्रिया करण्यासाठी राबवण्यात येणारी 'बायाे मायनिंग' प्रक्रिया नवीन हाेती. या प्रक्रियेचा अभ्यास करून त्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी शासनाने समिती गठीत केली हाेती. त्या समितीच्या शिफारशींनंतर काही शहरांत परवानगी दिली हाेती. त्यातील अनुभव विचारात घेऊन अाता राज्यातील १८० शहरांसाठी बायाे मायनिंग प्रक्रियेचा समावेश करण्यात अाला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...