आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोमणे मारल्याने पतीने केला पत्नीचा निर्घृन खून; काही वेळातच धावत्या रेल्वेखाली उडी घेत स्वतः केली आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काम करीत नाही, रिकामा राहतो असे बोलल्याचा राग आल्यामुळे संतापलेल्या पतीने कुऱ्हाडीने वार करत पत्नीचा केला खून
  • 12 वर्षीय मुलीच्या डोळ्यासमोर घडला हा खुनाचा थरार

जळगाव - 'काम करीत नाही, रिकामा राहतो, पोट कसे भरणार' असे पत्नीने बोलल्याचा राग आल्यामुळे पतीने तिच्यावर कुऱ्हाडीने वार करुन ठार मारले. यानंतर धावत्या रेल्वेसमोर उडी घेत स्वत:ही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना खेडी गावातील डॉ.बाबाबसाहेब आंबेडकरनगरात बुधवारी पहाटे घडली. विषेश म्हणजे खुनाचा हा थरार दाम्पत्याच्या 12 वर्षीय मुलीच्या डोळ्यासमोर घडला. सोनल समाधान सावळे (वय 30) व समाधान रमेश सावळे (वय 35, मुळ रा.धारशेरी, ता.धरणगाव, हल्ली मु. खेडी) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.याबाबतची माहिती अशी की, सोनी व समाधान यांचा 2006 मध्ये विवाह झाला होता. सुरूवातीला काही दिवस ते धारशेरी येथे राहिले. यानंतर कामधंद्याच्या निमित्ताने सुरत येथे गेले होते. तर वर्षभरापूर्वी खेडी येथे राहण्यासाठी आले होते. समाधान हा खासगी कंपनीत कामाला होता. परंतू, महिनाभरापासून त्याने काम सोडले होते. मंगळवारी दुपारी चार वाजता तो सुरत येथुन खेडीला परतला होता. यानंतर रात्री उशिरापर्यंत पत्नी सोनी, शालक अर्जुन भगवान भालेराव, मेहुणे ज्ञानेश्वर सोनवणे (रा.कोळन्हावी, ता.यावल) यांच्यासोबत अंगणात गप्पा करीत बसला होता. ‘काय नाकाच्या फिंगऱ्या फुलून पाहतो’ असे सोनी हिने समाधान याला गमतीत म्हटले होते. गप्पागोष्टी झाल्यानंतर समाधान, सोनी त्यांची मुले अंजली (वय 12), प्रज्ञा (वय 10), राज (वय 7), मेहुणे ज्ञानेश्वर सोनवणे व त्यांची मुलगी नेहा असे सर्वजण समाधान यांच्या घरात झोपले होते. पहाटे साडेचार वाजता समाधान याने पत्नी सोनी हिच्या गळ्यावर, हनुवटीवर कुऱ्हाडीने चार वार केले. यात ती गंभीर जखमी होऊन तडफडत होती. पलंगाचा आवाज आल्यामुळे मुलगी अंजली हिला जाग आली. यावेळी जखमी सोनी यांनी राजला माझ्या तोंडात पाणी टाकायला सांग असे मुलगी अंजली हिला सांगीतले. परंतू, समाधान याने पाणी टाकु दिले नाही. पाणी पाजले तर तुला पण मारुन टाकील अशी धमकी अंजलीला दिली होती. दरम्यान, पत्नीचा खुन केल्यानंतर समाधान याने घरातून पळ काढला. यानंतर अंजलीने रडत जाऊन शेजारी राहणारा मामा अर्जुन भगवान भालेराव याच्यासह कुटुंबियांना माहिती दिली. कुटुंबियांनी संबंधित घटना पोलिसांना कळवली. यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन सोनी यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवला. फॉरेन्सीक व्हॅन पथकाच्या मदतीने घटनास्थळावरुन पुरावे गोळा केले.