आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 केंद्रांवर 15 मिनिटांतच दहावी मराठीची प्रश्नपत्रिका बाहेर; व्हॉट्सअॅपवर पेपर, कॉपीबहाद्दरांची चंगळ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव : दहावीच्या परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी शहरातील अँग्लो उर्दू हायस्कूलच्या बाहेर १५ मिनिटांतच मराठीची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर बाहेर आली. ती पाहून केंद्रात परीक्षा देण्यास बसलेल्या विद्यार्थ्यांना सर्रास कॉप्या पुरवण्यात आल्या. जळगाव शहरातील नूतन मराठा विद्यालयाच्या केंद्रावर मुलांनी पत्र्यावर चढून कॉप्या पुरवल्या. जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथेही मराठीची प्रश्नपत्रिका बाहेर आली होती.

दहावीचा पेपर फुटला नाही : शालेय शिक्षणमंत्री

मुंबई : कुऱ्हा काकोडा येथे पेपर फुटीबाबत शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या, नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला. विभागीय सचिवांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर केला. त्यानुसार या परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारची प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे त्या म्हणाल्या. 

बातम्या आणखी आहेत...