आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावातील प्रत्येक मालमत्तेला आता \'क्यूआर कोड\'ने मिळणार नवी ओळख...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- घरी येणाऱ्या नातेवाईकांना संपूर्ण पत्त्यासाेबत विशिष्ट खूण सांगावी लागते. त्यानंतरही घर शाेधण्यात प्रचंड त्रास हाेताे. परंतु, आता महापालिका प्रत्येक मालमत्तेला विशिष्ट काेड देणार आहे. त्यामुळे तुमचे घर काेणत्या भागात आहे हे शाेधणे अधिक साेपे हाेईल. यात प्रभाग समिती व वसुली वाॅर्डनिहाय मालमत्तेला क्रमांक असतील. हे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रत्येक घरासमाेर 'अॅक्रेलिक प्लेट' लावण्याचे नियाेजन आहे. 'क्युआर काेड' देण्याचे प्रयत्न आहेत. 

 

शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण न झाल्याने महापालिकेने दाेन वर्षांपासून प्रत्येक मालमत्तेची नव्याने माहिती घेण्याचे काम हाती घेतले आहे. अमरावती येथील खासगी कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक मालमत्तेची नाेंद करण्याचे काम सुरू अाहे. यात शहरात सुमारे १५ हजारांपेक्षा जास्त मालमत्ता नव्याने आढळून अाल्या असून त्याचा फायदा उत्पन्न वाढीसाठी हाेणार आहे. जीपीएस पध्दतीने करण्यात अालेल्या या सर्वेक्षणात प्रत्येक मालमत्तेची नाेंद हाेईल. 

 


भविष्यात टेलिफाेन, अग्निशमन, डाक विभागासाठी उपलब्ध हाेणार माहिती 
१ सर्वेक्षणानंतर आता महापालिकेने प्रत्येक मालमत्तेला स्वतंत्र क्रमांक देणे सुरू केले आहे. चारही प्रभाग समितींना ए, बी, सी तसेच डी अशी नवीन ओळख दिली आहे. चारही प्रभाग समितीमधील वसुल वाॅर्डला देखिल क्रमांक असेल. 


३ ही संपूर्ण माहिती भविष्यात टेलिफाेन, अग्निशमन, पाेस्ट विभागाला कळविण्यात येणार आहे. प्रत्येक विभागांत शहराचा नकाशा तयार करून त्याची माहिती तयार हाेईल. प्रत्येक मालमत्तेला दिलेला क्रमांक शहरात इतरत्र कुठेही नसेल. महत्त्वपूर्ण असा हा डेटा असणार अाहे. 


२ प्रभाग समितीचा काेड तसेच वसुली वाॅर्ड क्रमांकाच्या पुढे मालमत्तेचा क्रमांक अशी नवीन ओखळ असेल. यामुळे महापालिकेला मालमत्ता कराची वसुली असाे की दैनंदिन कचरा संकलनाची माहिती घेणे या मुळे अधिक साेईचे हाेणार आहे. 


१५,००० 
मालमत्ता वाढल्याचे समाेर आले आहे. 


१९ 
प्रभाग शहराचे तयार करण्यात आले आहेत. 


०१ 
वर्ष कालावधी प्रणालीसाठी लागणार अाहे. 


अॅक्रेलिक प्लेटमुळे राहणार लक्ष 
घनकचरा व्यवस्थापनातंर्गत प्रत्येक घरातून कचरा संकलन केले जाणार आहे. घंटागाडी काेणत्या घरातून कचरा संकलन केला? याची माहिती घेणे प्रशासनाला साेपे हाेणार आहे. प्रत्येक मालमत्तेला अॅक्रेलिक प्लेट लावून त्यावर क्युआर काेड देण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे. 


माेबाईलच्या सहाय्याने क्युआर काेड स्कॅन केल्यानंतर कचरा संकलन माहिती रेकाॅर्ड हाेईल. पालिकेच्या कर वसुली कर्मचाऱ्यांना क्युआर काेडच्या सहायाने मालमत्तेची संपुर्ण माहिती एका क्षणात मिळणे शक्य हाेईल. 


वर्षभरात काम हाेणार पूर्ण 
खासगी कंपनीच्या माध्यमातून मालमत्तांचे करण्यात येणारे सर्वेक्षण पूर्ण झाले अाहे. यात प्रभाग समिती व वसुली वाॅर्डनिहाय मालमत्तांना क्रमांक दिला आहे. मालमत्तेला दिलेला क्रमांक शहरात कुठेही नसेल. ती स्वतंत्र ओळख असेल. सर्वेक्षणानंतर १५ हजारापेक्षा जास्त मालमत्ता वाढल्या. उत्पन्न वाढीस उपयाेग हाेईल. अॅक्रेलिक प्लेट व क्युआर काेडमुळे मालमत्तांची संपुर्ण माहिती उपलब्ध हाेईल. -विलास साेनवणी, प्रभाग अधिकारी, महापालिका 
 

 

बातम्या आणखी आहेत...