आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमसंबंधातून जळगावच्या तरुणाची सुरतमध्ये हत्या, पोलिसांत गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सुरत येथील तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तेथील तरुणांनी जळगावातील एका तरुणाचा चाकूने भोसकून खून केला. सोमवारी दुपारी ही घटना घडली, तर मंगळवारी पहाटे जखमी तरुणाचा मृत्यू झाला. रितेश सोमनाथ शिंपी (१८ ) असे मृताचे नाव आहे. रितेश हा कानुबाई उत्सवासाठी सुरत येथे मावशीकडे गेला होता. नवागाम डिंडोली येथे त्याची मावशी राहते. येथील एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याचा आरोप तेथील तरुण करत होते. रितेशने या तरुणीशी संबंध ठेवू नयेत, सुरतमध्ये येऊ नये, अशा धमक्या त्यांनी दिल्या होत्या. कानुबाई उत्सवानिमित्त रितेश शनिवारी रात्री सुरतला गेला होता. या वेळी दाेघांनी  त्याचा खून केला. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.