Home | National | Other State | Jallianwala Bagh massacre news in British news papers

जालियनवाला बाग हत्याकांड : ब्रिटिशांनी रक्तपात दडवला होता, वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराला २ वर्षे, साक्षीदारास ३ वर्षे तुरुंगात डांबले

दिव्य मराठी | Update - Apr 13, 2019, 11:59 AM IST

जालियनवाला बाग हत्याकांडाची हकिगत पत्रकार हॉर्निमन यांच्या ‘द डेली हेरॉल्ड’ मधील प्रकाशित बातमीने जगाला कळली

 • Jallianwala Bagh massacre news in British news papers

  १३ एप्रिल १९१९. शंभर वर्षांपूर्वी आजच्या दिवशी ब्रिटिशांनी अमृतसरमध्ये वैशाख मेळ्यासाठी जमलेल्या हजारो निष्पाप लोकांवर अमानुष गोळीबार केला होता. त्यात एक हजाराहून जास्त भारतीयांचा मृत्यू झाला होता. ब्रिटिशांनी ही बातमी एक महिना जगापासून दडवून ठेवली होती. परंतु पहिल्यांदा बाॅम्बे क्रॉनिकलचे संपादक बी.जी. हॉर्निमन यांनी या घटनेची अचूक बातमी व छायाचित्रासह वृत्तांत ब्रिटनच्या ‘द डेली हेरॉल्ड’ मध्ये प्रकाशित केला. तेव्हा जगाला हा रक्तपात समजला. हॉर्निमन यांच्यावर नाराज झालेल्या ब्रिटिश सरकारने त्यांना २ वर्षे तर साक्षीदारांना ३ वर्षे तुरुंगात डांबले .

  हॉर्निमन यांनी पुस्तकातून सत्य उघड केले

  आयर्लंड वंशाचे पत्रकार बेंजामिन गाय हॉर्निमन यांनी रक्तपाताच्या वृत्ताचे लेखन तर केले होते. परंतु १९२० मध्ये तुरुंगात असताना ‘अमृतसर अँड अवर ड्यूटी टू इंडिया’ नावाचे पुस्तकही लिहिले. त्यात त्यांनी जनरल डायर क्रूरकर्मा, अत्याचारी असल्याचे नमूद केले. या नरसंहाराची तुलना हॉर्निमन यांनी कांगो अत्याचार, फ्रान्स व बेल्जियममध्ये जर्मनीने केलेल्या नरसंहाराच्या घटनेशी केली. हे कृत्य ब्रिटिश सरकारवरील अमीट कलंक असल्याचे त्यांनी संबोधले. आपल्या जनरलने निष्पाप लोकांना कोणतीही सूचना न देता त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता. इंग्लंडच्या लोकांना हे सांगूनही कदाचित या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. सैनिकांच्या सगळ्या गोळ्या संपत नाहीत तोपर्यंत जनरल लोकांना मरताना पाहत होता, असे हॉर्निमन यांनी म्हटले आहे. या भागात सहा आठवडे मार्शल लॉ लागू होता. यादरम्यान लोकांना दंडुक्यांनी मारहाण करण्यात आली. त्यांना अकारण तुरुंगात डांबले गेले. गुजरांवालामध्ये लोकांवर बाॅम्ब डागले गेले व गोळीबारही केला. निर्वस्त्र लोकांना गुडघ्यावर बसून मारहाण केली. या घटनेची छायाचित्रही पुरावे म्हणून त्यात आहेत. हॉर्निमन यांनी ब्रिटनला त्यांचे कर्तव्य व जबाबदारीचे जाणीव करून दिली. हंटर कमिटीच्या अहवालात सत्य समोर आले आहे. त्यामुळे ब्रिटिशांची जगभरात बेअब्रू झाली.

  ब्रिटनचे तीन पीएम व महाराणीने घटनेचा उल्लेख केला, माफी मागितली नाही

  > 1920 : पंतप्रधान विंस्टन चर्चिल म्हणाले होते की, जालियनवाला घटना भयंकर व राक्षसी घटना होती.

  > 1997: महाराणी एलिझाबेथ द्वितीय म्हणाल्या, हे भारतासह आपल्या इतिहासातील एक वेदनादायी उदाहरण आहे.

  > 2013 : पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी अभिप्राय वहीत असे लिहिले- ‘या घटनेला आपण कधीही विसरता कामा नये.’

  > 2019 : पंतप्रधान थेरेसा मे म्हणाल्या- ही घटना ब्रिटिश इतिहासावरील कलंक आहे. वेदनेबद्दल दु:ख वाटते.

  > तेव्हा अमेरिका, ब्रिटनमध्ये नरसंहाराचे वृत्त दंगल म्हणून प्रकाशित केले होते

  वृत्त पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा..........

 • Jallianwala Bagh massacre news in British news papers

  द इव्हिनिंग मिसूरियन, 15 एप्रिल 1919
  भारतात दंगली भडकल्या

   

   

  लंडन| व्हाइसरॉयला आज मिळालेल्या अधिकृत पत्रात भारतात शुक्रवार व शनिवारी भयंकर दंगली भडकल्याची माहिती मिळाली. आंदोलकांच्या स्थलांतरणातून ही घटना घडली. अमृतसरमध्ये दोन बँका, एक टाऊनहॉल व गोदाम जळाले. पाच युरोपियन नागरिक मारले गेले. सैन्याने जमावावर गोळीबार केला. त्यात ९ जणांचा मृत्यू झाला तर २१ जखमी झाले. कसूरमध्ये ५ ठार झाले.

 • Jallianwala Bagh massacre news in British news papers

  द वॉशिंग्टन टाइम्स, 17 एप्रिल 1919
  भारतात कायदा बहाल

   

   

  लंडन| सिमल्यातून गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया यांच्या म्हणण्यानुसार गदारोळानंतर लाहोर, अमृतसर व अहमदाबादमध्ये आज पुन्हा कायदा व सुव्यवस्था लागू केली गेली. २५ मे १९१९ रोजी एक महिन्यानंतर ‘वॉशिंग्टन हेरॉल्ड’ने घटनेला दंगल असे म्हटलेे. ‘आयर्लंड, भारत, इजिप्त हे सिंहाच्या (ब्रिटन) पंजातील काट्यांप्रमाणे आहेत.’असे वर्णन वृत्तपत्राने केले होते.

 • Jallianwala Bagh massacre news in British news papers

  न्यूयॉर्क ट्रिब्यून, 18 एप्रिल 1919
  विमानांचा वापर 

   

   

  सिमला|पंजाबमध्ये सुरू असलेल्या दंगलीला रोखण्यासाठी विमानांचा वापर करण्यात आला. जमावाने प्रवासी रेल्वेवर हल्ला केला व गुजरांवालामध्ये रुळ उखडून टाकला. लाहोरहून विमान रवाना केले आहे व गर्दीवर बाॅम्बवर्षाव केला. मशीनगनने गोळीबारही केला. त्यामुळे दिल्ली व लाहोरमध्ये तणाव आहे. लाहोर व अमृतसरमध्ये मार्शल लॉ लागू केला आहे.
   

 • Jallianwala Bagh massacre news in British news papers

  बिसबी डेली रिव्यू, 19 एप्रिल1919 
  दंगलीत १०० मृत्युमुखी

   

   

  लंडन| ‘द इंडिया ऑफिस’ येथून तणावपूर्ण परिस्थितीवरील वृत्त आहे. एका जमावाने जाहीर सभेची परवानगी नसताना सभा घेतली. त्यानंतर गोळीबार झाला. त्यात १०० हून जास्त लोक मृत्युमुखी पडले. बेपत्ता झाले. १३ एप्रिल रोजी पंजाबमध्ये खजिन्यावर हल्ला झाला. त्यात एक ब्रिटिश सैनिक मारला गेला. दिल्लीत मुस्लिमांचा जमाव दुकान उघडण्यासाठी हस्तक्षेप करत होता. गोळीबार केला. 

Trending