आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडूत 'जल्लीकट‌्टू' स्पर्धेचा थरार, पहिल्या दिवशी अनेक तरुण जखमी 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडू- दक्षिण भारतातील तामिळनाडूत धष्टपुष्ट बैलांची झुंज लावल्या जाणाऱ्या स्पर्धेचे आयाेजन केले जाते. यास 'जल्लीकट्टू' म्हणतात. त्यानुसार बुधवार, १६ जानेवारी रोजी मदुराईच्या पलामेडू गावात वार्षिक बुल टॅमिंग इव्हेंट 'जल्लीकट्टू' स्पर्धा झाली. त्यात सहभागी बैलाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणार हे स्पर्धक.

 

या थरारक स्पर्धेत पहिल्या दिवशी अनेक तरुण जखमी झाले; परंतु तरीही हा पारंपरिक महोत्सव प्राणीप्रेमींना आकर्षित करताे, असे आयाेजकांनी सांगितले. दरम्यान, या राज्यात ही स्पर्धा खूपच प्रसिद्ध आहे. मध्यंतरी या स्पर्धेसाठी बैलांचा अमानवी पद्धतीने वापर केला जात असल्याचा आराेप करून प्राणिप्रेमींनी न्यायालयात धाव घेतली हाेती. मात्र, तरीही तामिळनाडूत या स्पर्धेची क्रेझ जराही कमी झालेली नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...