आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-राष्ट्रवादीच्या गटांत तुंबळ हाणामारी, जामखेडच्या उपसरपंचासह 2 पोलिंग एजंट जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - जिल्ह्यातील अंबड तालुक्यात जामखेडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. मतदान सुरू असताना मतदान केंद्र क्रमांक 5 आणि 6 वर भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. अवघ्या काही मिनिटांतच त्याचे हाणामारीत रुपांतर झाले. दुपारच्या ही घटना घडली असून यात 3 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.


मतदानाच्या दिवशी दुपारी ही घटना घडली. या हाणामारीत राष्ट्रवादीच्या पोलिंग एजंटला बेदम मारहाण करण्यात आली आहे. दोन्हीकडून झालेल्या भांडणात जामखेड गावचे उपसरपंच आणि 2 पोलिंग एजंट असे तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी अंबड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोगस मतदानाच्या आरोपावरून वाद झाला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. दरम्यान, हे दोन्ही गट परस्पर विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता त्याठिकाणी सुद्धा तणाव निर्माण झाला.