आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिल्लर जमा करून अर्ज भरणाऱ्या उमेदवारांकडे जालनेकरांचे लक्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - मतदार आपल्याकडे कसा आकर्षित होईल तसेच स्वत:चा स्वार्थ कसा साधता येईल, या हेतूने अनेकजण निवडणुकीच्या रिंगणात उभे राहतात. अनेक निवडणुकांमध्ये काही उमेदवार अनामत म्हणून काही उमेदवार चिल्लर रक्कम भरतात. यात निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांचा वेळ तर जातोच, ही रक्कम मोजताना नाकीनऊ येते. यामुळे इतर कामांवरही परिणाम होतो. ही रक्कम मला मतदारांनीच दिली, असा आव आणतात. २८ मार्चपासून लोकसभेचे उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. जालन्यातही अशा प्रकारची उमेदवारी किती जण दाखल करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.    


सध्या निवडणुकीचा काळ असल्यामुळे अनेक उमेदवार मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध शक्कल लढवत असतात. मोठमोठे पक्ष वगळता काही जण नुकतेच निवडणूक लढवत असतात, तर काही जुनेही उमेदवार असतात. मतदार आपल्याकडे कसा आकर्षित करता येईल, यासाठी नवनवीन संकल्पना करत असतात. दरम्यान, विविध निवडणुकांमध्ये सध्या ‘गल्लीत गोंधळ-दिल्लीत मुजरा’ या चित्रपटात मकरंद अनासपुरे हा उमेदवारी अर्ज भरताना चिल्लर रक्कम भरतानाची संकल्पना जोरात सुरु आहे. चिल्लर रक्कम आणल्यानंतर ती रक्कम मोजताना निवडणूक विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत असते. यापूर्वी विविध जिल्ह्यांमध्ये निवडणुकांमध्ये अनामत रक्कम उमेदवारांनी भरली आहे, परंतु या चिल्लरबाज उमेदवारांना अपयशच मिळाल्याचे दिसून आलेले आहे. लोकसभा निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. अनेकांनी आपापली उमेदवारी घोषित करून नागरिकांसमोर चर्चेत राहण्यासाठी विविध मार्ग अवलंबत आहेत.   


नामुष्की की डिपॉझिट जप्त    
जालना मतदार संघात काही पक्षांनी उमेदवारी जाहीर केली तर काही पक्षांकडून अजूनही नावे स्पष्ट झाली नाहीत. या वेळी नवखे चेहरेही रणांगणात येण्याची शक्यता आहे, परंतु हे नवखे चेहरे किती मतदान खातात की, डिपॉझिट जप्त होऊन त्यांच्यावर नामुष्कीची वेळ येते, हे येणाऱ्या काळातच पाहायला मिळणार आहे. जवळपास सतरा उमेदवारी अर्ज भरले जाणार असल्याची शक्यता निवडणुकीच्या राजकीय रंगातून  दिसून येत असली तरी रणांगणात कोण राहते, हे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेच्या दिवशी समोर येणार आहे.   


जिल्ह्यात २००५ सर्व्हिस व्होटर :  जालना लोकसभा मतदारसंघात जालन्याचा व काही औरंगाबादचा भाग असा मिळून निवडणुका होत आहेत. मतदारांपैकी जालना जिल्ह्यात २००५ सर्व्हिस व्होटर आहेत. लष्करी, केंद्रीय, राज्य सशस्त्र पोलिस दलातील जवान (सर्व्हिस व्होटर्स) तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टिम (इटीपीबीएस) उपलब्ध करून दिली आहे. जालना जिल्ह्यात ही संख्या २ हजार ५ अाहे.

बातम्या आणखी आहेत...