आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा निवडणूक 2019 : रावसाहेब दानवेंचा ५५, तर औताडेंचा ३३ लाखांचा खर्च

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - सभा, रॅली, जाहिराती यासारख्या प्रचाराच्या विविध माध्यमांवर उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. तो खर्च निवडणूक विभागाकडे उमेदवारांना सादर करणे बंधनकारक आहे. दरम्यान, भाजपचे रावसाहेब दानवे यांनी ५५ लाख ५२ हजार, तर काँग्रेसचे विलास औताडे यांनी ३३ लाख ४ हजार ७२६ रुपये खर्च केल्याची नोंद करण्यात आली. परंतु यानंतर ताळमेळ बैठक होऊन नेमक्या खर्चाची माहिती समोर येईल. जालना लोकसभा मतदारसंघात वीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. आतापर्यंत उमेदवारांच्या खर्चाच्या बाबतीत तीन तपासणी फेऱ्या झाल्या आहेत. पहिल्या तपासणी फेरीत चार उमेदवारांनी अनुपस्थिती दर्शवली होती. दुसरी फेरी तपासणी १७ एप्रिल रोजी पार पडली. यात सर्व उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले. परंतु अनेकांच्या खर्चात तफावत दिसून आली होती. यात काही उमेदवारांना नोटिसा दिल्या होत्या. उमेदवारांनी दररोज कार्यक्रम घेत असताना त्याचा खर्च नोंदवहीत ठेवण्याचे बंधनकारक आहे. त्या खर्चाची नोंद निवडणूक विभागाकडून घेतली जात असते. उमेदवारांकडून सादर झालेल्या तसेच निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानुसार २१ एप्रिलपर्यंतचा खर्च सादर झालेला आहे. यात भाजपचे रावसाहेब दानवे यांनी ५५ लाख ५२ हजार, तर काँग्रेसचे विलास औताडे यांचा ३३ लाख ४ हजार रुपये, वंचित आघाडीचे डॉ. शरदचंद्र वानखेडे ४ लाख ४८ हजारांचा खर्च झाला असल्याचे सांगण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...