Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Jalna police destroyed Ganja after 27 years

जप्त केलेला गांजा 27 वर्षांनंतर नष्ट; जालना पोलिस मुख्यालय परिसरात जाळला गांजा 

प्रतिनिधी | Update - Feb 14, 2019, 08:37 AM IST

सन १९९२ मध्ये परळी ग्रामीण पोलिसांनी एका गांजा विक्रेत्यावर कारवाई करून त्याच्याकडून १०० ग्रॅम गांजा जप्त केला होता

  • Jalna police destroyed Ganja after 27 years

    बीड- पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेला गांजा बुधवारी पोलिस मुख्यालयाच्या परिसरात नष्ट करण्यात आला. दरम्यान, यामध्ये थेट १९९२ सालच्या कारवाईतील गांजाचा समावेश होता. परळी ग्रामीण व शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईचा यामध्ये समावेश आहे.

    सन १९९२ मध्ये परळी ग्रामीण पोलिसांनी एका गांजा विक्रेत्यावर कारवाई करून त्याच्याकडून १०० ग्रॅम गांजा जप्त केला होता, तर सन २००५ मध्ये एका गांजा विक्रेत्यावर कारवाई करून ६५० ग्रॅम गांजा जप्त केला होता. शिवाजीनगर पोलिसांनी २०१० मध्ये एका गांजा विक्रेत्यावर कारवाई करून ४० ग्रॅम गांजा जप्त केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात येत असते. अखेर या प्रकरणातील जप्त गांजा नष्ट करण्याला न्यायालयाने परवानगी दिल्याने बुधवारी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर हा गांजा नष्ट करण्यात आला. या वेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक घनश्याम पाळवदे, पोलिस हेड कॉन्स्टेबल बालाजी दराडे, गणेश हंगे यांचासह पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Trending