आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिस्तूल विक्री, वापरातून जालन्याचे बिहार करण्यात पोलिसांच्या नातेवाइकांचाही ‘हात’

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

लहू गाढे 

जालना - जालना जिल्ह्यात छोटा राजनशी निगडित गँग, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातून येणाऱ्या पिस्तुलांची २० हजारांपासून ते १ लाखांपर्यंत विक्री होत आहे.  सहजपणे पिस्तूल मिळत असल्याने एका घटनेत झालेल्या गाेळीबारात एकाला प्राणास मुकावे लागले. आठ गुन्ह्यांमुळे पोलिस प्रशासन सतर्क हाेण्याचे आदेश आयजींनी दिले आहेत. चार गुन्ह्यांत तर प्रशासनातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचेच नातेवाईक निघाले आहेत. जालन्याचे ‘बिहार’ करण्यासाठी पोलिसांचे नातेवाईकही कारणीभूत ठरत आहेत. यामुळे एसपींनी आता मुळात जाण्यासाठी ‘स्पेशल यंत्रणा’ कामाला लावून हे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे आश्वासनच आयजी डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांना दिले आहे. जालन जिल्ह्यात वर्षभरापासून गावठी पिस्तूल वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये गोळीबार झाल्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  गुन्ह्यांमध्ये वापर करण्यासाठी अथवा धमकी देण्यासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुले मागवली जात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. सिंगल राउंड ते नऊ राउंडपर्यंतची पिस्तुले २० हजारांपासून ते १ लाखांपर्यंत विक्री होत असल्याचे समोर आले आहे.  

जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली :


चोऱ्या, घरफोड्या, अशा घटना सातत्याने वाढत आहेत. दुचाक्या चोरीस जाणे, वाटमारी, अवैध दारू विक्री, महिलांच्या अंगावरील दागिने लुटणे, किरकोळ चोऱ्या या समस्यांनी जालनेकर त्रस्त आहेत.  आता  गुन्ह्यांमध्ये  गावठी पिस्तुलांचा वापर होत आहे. पिस्तुले आणणाऱ्यांच्या पोलिस मागावर, नातेवाईक पोलिसांचाही शोध घेणार
 
पोलिस प्रशासनाने आठ ठिकाणी पिस्तुले जप्त केली आहेत. यातील चार गुन्ह्यांमध्ये पोलिसांचेच नातेवाईक असल्यामुळे प्रशासनाने आता कोण पिस्तुले आणतो, कुठे, कशी विक्री करतो हे शोधण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी पोलिस प्रशासनातून कुणाची मदत मिळते का, या दृष्टीने पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांनी नियुक्त केलेल्या गोपनीय खबऱ्यांमार्फत तपास कार्य सुरू आहे. अनेक गुंड गावठी कट्टे, पिस्तूल कमरेला बांधून फिरत अाहेत.  ही शस्त्रे खरेदी केल्यानंतर त्यांना काडतुसे घ्यावीच लागतात. ती कशी आणि कुठे मिळतात, हा तपास लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. जालना जिल्ह्यात परवाना घेऊन ६४१ जण शस्त्रे वापरत आहेत. यात अधिकारी, बँकेच्या सुरक्षा रक्षकांसह इतर सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर व एडीएसचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांनी ही पिस्तुले जप्त करून काहींना अटकही केली आहे. 
 अकरा महिन्यांत घडलेल्या ‘फायरिंग’ व धमकावण्याच्या घटना
 
२८ मार्च : जालना तालुक्यातील मांडवा येथे वरातीत गोळीबार. 

२३ मे : परतूर येथे सोन्याचे दुकान पिस्तुलाचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न. 

०३ जून : जालना शहरातील चंदनझिरा भागातील सुंदरनगरातून एक पिस्तूल जप्त.

१७ जून :  अंबड चौफुलीवर एडीएसच्या पथकाने एकाच्या ताब्यातून गावठी पिस्तुल जप्त. 


३० ऑगस्ट : जालन्यातील लॉजमध्ये गावठी पिस्तुलासह शस्त्रे विक्रीतून एसआरपीएफ जवान ताब्यात. 

७ ऑक्टोबर : बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथे गोळीबारातून संजय अंभोरे या व्यक्तीचा खून. 

३० ऑक्टोबर : जालना शहरातील वन विभागाच्या प्रवेशद्वाराजवळ व्यापाऱ्यावर गोळीबार. 
 

१८ नोव्हेंबर : गावठी पिस्तुल घेऊन जाणारा विद्यार्थी एडीएसच्या ताब्यात. या आठ गुन्ह्यांपैकी चार गुन्ह्यांत पोलिसांना  आरोपींकडे गावठी पिस्तुल कसे आले, यात कोणत्या पोलिसांच्या नातेवाइकांचा हात आहे, याची माहिती पोलिस अधीक्षक घेत आहेत, अस एसपी एस. चैतन्य यांनी सांगितले.