आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टील, बियाणे उत्पादनात नाव कमावलेल्या जालन्याला गांजाचे ग्रहण; गाेव्यापर्यंत तस्करी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना -  अांध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश लागून असलेल्या महाराष्ट्राचा मध्य केंद्र म्हणून जालन्याची ओळख आहे. या ठिकाणाहूनच तिन्ही राज्यांत प्रवेश होतो. आता जिल्ह्यात गुटख्यासह गांजा तस्करीच्या घटनांत वाढ झाल्यामुळे जिल्ह्याच्या लौकिकाला तडा गेला अाहे. मागील काही दिवसांमध्ये औरंगाबाद तसेच जालना पोलिसांनी वर्षभरात ४० लाख रुपयांचा गांजा जप्त केला अाहे. आठ दिवसांपूर्वीच एका शेतकऱ्याच्या शेतात गांजाची झाडे आढळून आल्यामुळे या व्यवसायाची पाळेमुळे खोलवर रुजली असल्याचे स्पष्ट झाले आहे. जालनातून बंगळुरू, हैदराबाद, मुंबई, पुण्याकडे गांजा पाठवला जातो. कर्नाटक मार्गे त्याची तस्करी केली जाते. गोव्यालाही मोठ्या प्रमाणात या परिसरातून गांजा पुरवला जात असल्याचे पोलिस तपासात समोर आले. 


एखाद्या पिकात अांतरपीक म्हणून गांजाची शेती केल्याचे उघड हाेण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना हाेती. यानंतर पाेलिस यंत्रणा अधिक सतर्क झाली अाहे. झेंडू किंवा ऊसामध्ये अशा प्रकारे छुप्या पद्धतीने गांजाची झाडे लावली जात असल्याचे पाेलिसांना अाढळून अाले अाहे. 

 

बसमधून परराज्यात गांजा होतो पार्सल   
गांजाचे उत्पादन घेतल्यानंतर गुप्त पद्धतीने विक्री करण्यासाठी काही माफिया कार्यरत आहेत. परराज्यात पार्सल करण्यासाठीही चोरटे सक्रिय झाले आहेत. दरम्यान,  ३० मे रोजी एक जण गांजा विक्री करण्यासाठी अंगावर मळके कपडे, पाठीवर भिकाऱ्याजवळ असलेल्या पोत्यासारखी गोणी घेऊन जात असताना विदर्भातील  एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. अशा प्रकारे गुटखा पार्सल  करताना एक महिला पोलिसांनी शहरातील रामतीर्थ पुलाजवळून ताब्यात घेतली आहे.  

 

बियाणे येते कर्नाटकातून
गांजाच्या झाडांचा वास दूरपर्यंत पसरतो. त्यामुळे मोठ्या क्षेत्रातील उसात याची लागवड केली जाते. शिवाय झेंडूच्या झाडासारखीच गांजाची झाडे असल्याने झेंडूमध्येही हे पीक घेतले जाते.  उत्पादकांकडून कर्नाटकातून बियाणे खरेदी केले जात आहे. सीमा भागातील शहरांमध्ये याचे बियाणे सहज उपलब्ध होत असल्याने उत्पादक तेथूनच बियाणे खरेदी करतात.

बातम्या आणखी आहेत...