आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत कामगारांच्या कुटुंबीयांना ११ लाखांची मदत, एका वारसाला कायमस्वरूपी नोकरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
  • जालन्याच्या ओम साईराम दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू
  • तिघांवर उपचार सुरू, एकाची प्रकृती चिंताजनक

जालना - जालना शहरातील आैद्योगिक वसाहतीतील ओम साईराम कंपनीत दुर्दैवी घटना घडून आठ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना जामीनही मंजूर झाला आहे. दरम्यान, संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनाने संपूर्ण उपचाराचा खर्च उचलण्यासह मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ११ लाख रुपयांच्या मदतीसह त्यांच्या एका वारसास कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे.  लेडरमध्ये गॅस कोंडी होऊन वितळलेले लोखंड अंगावर पडून ११ जण गंभीर जखमी झाले होते. जखमी असलेल्या तीन जणांवर उपचार सुरू आहेत. यातील एकाची तब्येत अजूनही चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिघांवर उपचार सुरू, एकाची प्रकृती चिंताजनक

ओम साईराम कंपनीतील दुर्दैवी घटनेत भरत रामदेव पंडित (३१), अजयकुमार रामसकाल सहानी (२२), रामहित सिंह (२०), अनिलकुमार ललन ओझा (१९), राकेश रामप्रताप पाल (२६), राजकुमार अशोककुमार सिंग (२५), प्रदीपकुमार रामजी यादव (२५), प्रदीप राय हे कामगार मृत्युमुखी पडले आहेत. मोद मोझम्मिल अबू निसार (२०), संजीवकुमार आनंद राय (२०), अनिलकुमार नंदुराम (३४) यांच्यावर उपचार सुरू आहेत.