आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजसा ऋतू बदलतो त्याचा परिणाम आपल्या शरीराच्या काही भागांवर होतो. विशेषत: नाक, घसा आणि डोळे. आजकल कित्येक लाेकांना ऋतू बदल्यामुळे नेहमी नाक बंद होणे, शिंका येणे, डोळ्यांत खाज आल्यासारखी वाटणे, घसा बसण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशात जलनेति क्रियेद्वारे आराम मिळू शकतो.
जलनेतिमध्ये पाण्याच्या द्वारे नाकाची स्वच्छता केली जाते. ज्यामुळे तुम्ही सायनस, सर्दी-पडसे, प्रदूषण आदींपासून बचाव करू शकता. हे करण्यासाठी मीठ असलेल्या काेमट पाण्याचा वापर केला जातो. या क्रियेमध्ये पाण्याला नेति पात्राच्या मदतीने नाकाच्या एका नाकपुडीत टाकले जाते आणि दुसऱ्या नाकपुडीतून काढले जाते. नंतर याच क्रियेला दुसऱ्या नाकपुडीतून काढले जाते. जलनेति दिवसातून कोणत्याही वेळी केली जाऊ श्काते. हे नियमित केल्यास हे नाकात किटाणू होऊ देत नाहीत.
विधी
अर्धा लिटर कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळा आणि नेतिच्या भांड्यात हे पाणी भरा. अाता तुम्ही कागासनात बसा. पायांमध्ये दीड ते दोन फुटांचे अंतर ठेवा. कमरेतून पुढे वाका. नाकाची जी नाकपुडी त्या वेळी जास्त सक्रिय राहील, त्याच्या विपरीत दिशेला डोक्याला वाकवा.
आता नाकाच्या एका नाकपुढीत नेति पात्राच्या नळीने पाणी टाका. पाणी हळूहळू टाका. यादरम्यान तोंड उघडे ठेवा आिण दीर्घ श्वास घेऊ नका. हे पाणी नाकाच्या दुसऱ्या नाकपुडीतून निघायला पाहिजे. या प्रक्रियेला नाकाच्या दुसऱ्या नाकपुडीने करा. दोन्ही नाकपुड्यांनी ही प्रक्रिया केल्यानंतर सरळ उभे राहा आणि खाली सांगितल्याप्रमाणे जलनेति क्रियेनंतर करणारा योगाभ्यास करा. यामुळे नाकाच्या आतील सर्व पाणी, बॅक्टेरिया आिण मेकडू बाहेर येतो.
फायदे
- यामुळे नाकाची स्वच्छता होते. श्वासनलिकेसंबंधीचा त्रास, जनुी सर्दी, दमा, श्वास घेण्यास त्रास आदी समस्यांपासून मुक्ती देते.
- डोळ्यांत पाणी येणे, डोळ्यांत जळजळीसारख्या समस्यांपासून वाचवते.
- कान, डोळे आिण घशाच्या आरोग्यामध्ये पूर्णपणे सुधार आणते. डोकेदुखी, झोप न येणे, आळस येणे यामध्ये लाभदायी आहे.
जलनेतिनंतर करावयाचे याेगाभ्यास
- हे निश्चित करणे जरुरी अाहे की, जलनेति क्रियेनंतर नाकांच्या छिद्रांमध्ये पाणी राहू नये. कारण यामुळे सर्दी होऊ शकते. कित्येकदा नाकपुड्या बंद होतात किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. यामुळे संसर्ग किंवा शरीराच्या तापमानात वाढ होऊ शकते. म्हणून जलनेति क्रियेनंतर एक नाकपुडी बंद करून दुसऱ्या नाकपुडीतून नंतर दुसऱ्या नाकपुडीला बंद करून आधी नाकपुडीतून हळूहळू हवा बाहेर काढा.
जलनेतिबद्दल वैज्ञानिक मत
जलनेतिमध्ये मीठ टाकलेल्या पाण्याचा प्रयोग केल्यामुळे नाकाच्या आतील पापुद्र्यामध्ये रक्तप्रवाह वाढतो. यामुळे नोजल ग्लँडची स्वच्छता होते आिण इतर सायनसला लाभ होतो.
दक्षता
- सुरुवातीला ही क्रिया एखाद्या तज्ज्ञाच्या देखदेखीखाली करावी.
- जलनेतिनंतर नाकातील पाणी पूर्णपणे काढण्यासाठी कपालभाती प्राणायाम करणे लाभदायी आहे.
- जलनेति केल्यानंतर त्वरित झोपू नये. यामुळे पाणी श्वासनलिकेतून फुप्फुसात जाऊ शकते. यामुळे फुप्फुसात संसर्ग होऊ शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.