आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयुक्त‍ची बोगस कामे; चार अधिकारी निलंबित, गंगापूर, खुलताबाद तालुक्यातील कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जलयुक्त‍ शिवार योजनेत निकृष्ट कामे केल्याबद्दल गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील जलसंधारण विभागाचे ४ अधिकारी निलंबित करण्यात आले. जिल्हा जलसंधारण अधिकारी पदावर कार्यरत कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांची परभणी जिल्हा परिषदेत बदली झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून ही कारवाई झाली. 'दिव्य मराठी'ने २५ डिसेंबर २०१७ रोजी या कामांतील गैरव्यवहार उघड केला होता. 


मुख्यमंत्र्यांनी बुधवारी औरंगाबाद जिल्हा आढावा बैठक घेतली. त्यात या गैरव्यवहाराबद्दल मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे संकेत दिले होते. गंगापूरचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी बाळू विठ्ठल सोनवणे, जलसंधारण अधिकारी नवनाथ राधाकिशन वखरे, खुलताबादचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी नरेंद्र पांडुरंग कटके आणि जलसंधारण अधिकारी गोरेपाशा अब्दुल मजीद शेख हे निलंबित झाले. गंगापूर, खुलताबाद तालुक्यात सिमेंट नाला बंधाऱ्यांची शेकडो कामे बोगस झाल्याची तक्रार आमदार प्रशांत बंब यांनी केली होती. त्यावरून निवडक कामांची तांत्रिक तपासणी अधीक्षक अभियंता नाथ यांच्या उपस्थितीत झाली. 


गुन्हे दाखल करून रक्कम वसूल करण्यात येणार 
जलयुक्त शिवार योजनेची बोगस कामे करणाऱ्या अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून पैशांची वसुली केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी बुधवारच्या बैठकीत म्हटले आहे. त्यानुसार पुढील पावले उचलली जातील, अशी माहिती सू्त्रांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...