आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Jamait E Ulma Hind Writes To Sonia Gandhi, Urges To Not To Support Shiv Sena In Maharashtra News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेनेला पाठिंबा देऊ नये; जमियत उलेमा-ए-हिंदचे सोनिया गांधींना पत्र

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - मुस्लिम समुदायाच्या सर्वात मोठ्या संघटनांपैकी एक जमियत उलेमा-ए-हिंदने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेनेला पाठिंबा देऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. काँग्रेस एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. अशात त्यांनी शिवसेनेला महाराष्ट्रात पाठिंबा देऊन सरकार स्थापित केल्यास हे काँग्रेससाठी धोकादायक ठरेल असेही या पत्रातून सांगण्यात आले आहे.

धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवणाऱ्यांना धक्का बसेल
 
जमियतचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधींना एक पत्र पाठवले. त्यानुसार, "महाराष्ट्रात काँग्रेसच्या मदतीने शिवसेना सरकार बनवणार अशा चर्चा सुरू आहेत. यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते सुद्धा चर्चा करत आहेत. जर खरंच काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला तर हे अतिशय दुर्दैवी आणि काँग्रेससाठी घातक ठरेल. शिवसेनेची विचारसरणी काय आहे, आणि त्यांनी कोणती कामे केली याची सर्वांनाच माहिती आहे. अशात काँग्रेस शिवसेनेसारख्या पक्षाला पाठिंबा देत असेल तर धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी हा खूप मोठा धक्का मानला जाईल." मदनी यांनी हे पत्र सोमवारी पाठवले असून मंगळवारी याची माहिती समोर आली.

बातम्या आणखी आहेत...