Health / हृदय आणि पोटाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे जांभूळ 

जांभळात अंथोसायनिडिंस, अलेजियेक अॅसिड आणि अंथोसायनिंस असते. यात अँटीइंफ्लेमेटरी गुण असतात

रिलिजन डेस्क

Jul 09,2019 12:20:00 AM IST

सामान्यत: जांभूळ मधुमेहाच्या उपचारासाठी फायदेशीर मानले जाते. फक्त मधुमेहासाठीच नव्हे तर जांभळामध्ये असणारे पोषक तत्त्वे शरीराच्या या तीन भागांना निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.

हृदय
जांभळात अंथोसायनिडिंस, अलेजियेक अॅसिड आणि अंथोसायनिंस असते. यात अँटीइंफ्लेमेटरी गुण असतात जे हृदयाच्या आजारांपासून बचाव करतात. जांभळामध्ये अँटीऑक्सीडेंटसची मात्रा पुरेशी असते. जे कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करते. यात असणाऱ्या पोटॅशियमची अधिक मात्रेमुळे हायपरटेंशनपासून बचाव करण्यास सहायक आहे.


दात
हिरड्या आणि दातांसाठी जांभूळ खूप फायदेशीर आहे. जांभळाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतो. ज्यामुळे हिरड्यातून रक्त येण्याची समस्या दूर होते. जांभळाची पाने वाळवून याची पावडर तयार करून दात घासण्यासाठी याचा वापर केला जातो. यामुळे दातांच्या इंफेक्शनपासून बचाव होतो.


पोट
पोटाच्या समस्येपासून आराम मिळण्यासाठी जांभूळ लाभदायी मानले जाते. सैंधव मीठासोबत खाल्ल्यास भूक वाढते. हे यकृताच्या आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी या ऋुतूत रोज जांभूळ खावे. याच्या बियांना वाळवून ठेवा. याचा फायदा इतर ऋुतूत घेऊ शकताे.


असे करू नका
- जांभूळ कधीच उपाशीपोटी खाऊ नका.
- हे खाल्ल्यानंतर १ तास दूध पिऊ नका.
- एकावेळी 200 ग्रॅमपेक्षा जास्त जांभूळ खाऊ नका.

X
COMMENT