आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेम्स बाँड : अय्यार, शॉन कॉनेरी आणि क्रेग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इयान फ्लेमिंगने जेम्स बाँड नावाचे पात्र रचून काही पुस्तके लिहिली. एका पुस्तकावरून प्रेरित पहिल्या चित्रपटाचे नाव होते, ‘डॉक्टर नो’, ज्यात शॉन कॉनेरीने जेम्स बाँडची भूमिका केली होती. काही बाँडपटांत अभिनय केल्यानंतर आपल्या अभिनय कलेच्या विकासासाठी त्याने जेम्स बाँडच्या भूमिका करण्यास नकार दिला. पण अन्य कलाकारांसमवेत बाँडपट बनत गेले आणि डॅनियल क्रेगने ‘कॅसिनो रॉयल’ मध्ये भूमिका केली. डॅनियल क्रेग अतिशय लोकप्रिय झाले. जेम्स बाँड मालिकेतील नव्या चित्रपटाचे नाव आहे, ‘नो टाइम टू डाय’. हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होईल. भारतात हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेतही हा चित्रपट डब केला जाणार आहे. इयान फ्लेमिंगने लिहिलेल्या पुस्तकांपेक्षा अधिक संख्येने जेम्स बाँडचे चित्रपट बनले आहेत. खरे पाहता जेम्स बाँड हा एक ब्रँड आहे, तो जितका यशस्वी करता येणे शक्य आहे, तेवढा प्रयत्न केला जाईल. या पात्राचा जन्म शीतयुद्धाच्या काळात झाला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर असा निश्चय केला गेला की, तिसरे महायुद्ध कधीच होऊ नये. या कारणामुळे जेम्स बाँड हे पात्र अस्तित्वात आले. हे पात्र एकटेच विरोधकांच्या अड्ड्यावर जाऊन तेथील शस्त्राचे भांडार नष्ट करते आणि श़त्रुदेशाच्या महिलेवर प्रेमही करते. एका जेम्स बाँड चित्रपटाचे नाव आहे, ‘फ्रॉम रशिया विथ लव्ह’. डॅनियल क्रेगनेही जेम्स बाँडचे पात्र करण्यास नकार दिला, पण निर्मात्याने मोठ्या मिनतवारीने हा चित्रपट करण्यास तयार केले. जेम्स बाँड चित्रपटासाठी अस्त्र-शस्त्र, कार, विमान इत्यादी उपकरणांची निर्मिती करण्यात येते. जेम्स बाँडची कार रस्त्यावर पळत असतानाच समुद्रावर तरंगूही शकते. हीच मोटार पाणबुडीप्रमाणेही काम करते. एका दृश्यात जेम्स बाँडची मोटार समुद्रकिनाऱ्यावर येते आणि तेथील माणसे हा प्रकार पाहून आश्चर्यचकित होतात. या अॅक्शन दृश्यात विनोदाचीही पेरणी करण्यात आली आहे. अमेरिकेचा चित्रपट उद्योग आपल्या ब्रँडच्या उसाच्या रसाचा शेवटचा थेंबही काढून घेईल, इतका व्यावहारिक आहे. स्टीव्हन स्पीलबर्गने ‘जुरासिक पार्क’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आवश्यक वस्तू आणि जनावरांची खेळणी बनवण्यासाठी काही कारखानेही उभारले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दिवशीच डायनासोरची खेळणी बाजारात आली होती. मूळ उद्योगापेक्षा उपउद्योगातून काही वेळा अधिक कमाई होते. इयान प्लेमिंगची पुस्तके एका ठरावीक फॉर्म्युल्यावर बनतात. त्यात काही महत्त्वाच्या गोष्टीही असतात. उदाहरणार्थ ‘डायमंड्स फॉरएव्हर’ पुस्तकात दक्षिण आफ्रिकेतील उत्खननाचे वर्णन आहे. खाणीतून हिरे काढणारे मजूर नेहमीच गरीब राहतात. सीआयए ही अमेरिकेची गुप्तचर संस्था आहे. रशियाची केजीबी आहे. भारतात सीबीआयसमवेत विदेशात हेरगिरी करणारी आणखी एक संस्थाही आहे. ‘नाम शबाना’ आणि ‘बेबी’ या चित्रपटामध्ये काल्पनिक संस्था दाखवण्यात आल्या. सलमान खान आणि कॅटरिना कैफ अभिनीत चित्रपटात सलमान हा भारतासाठी तर कॅटरिना पाकिस्तानसाठी काम करत असतात. दोघांमध्ये प्रेम होते आणि दोघेही गायब होतात. ‘राजी’ या चित्रपटात भारतीय मुलीचा विवाह पाकिस्तानी माणसाशी होतो आणि ती भारतासाठी हेरगिरी करते. या चित्रपटात प्रस्तुत विवाहही प्रायोजित आहे. सध्या हेरगिरीवर आधारित वेब सिरीज बनवल्या जात आहेत. विनोद पांडे आणि शिवम नायर यांच्या मालिकेचे प्रदर्शन १७ मार्चपासून होत आहे. हे दोन्ही चित्रपट निर्माते हेरगिरीवर आणखी एक वेब सिरीज बनवत आहेत. गेल्या शतकात देवकीनंदन खत्री यांनी अय्यार केंद्रित चंद्रकांता, भूतनाथ इत्यादी पुस्तके लिहिली होती. या पुस्तकातील तर्कहीन गोष्टीच आता बाँडपटात दाखवल्या जात आहेत. खरंच, चित्रपट ही विश्वास देणारी कला आहे.

बातम्या आणखी आहेत...