कोरोना व्हायरस / जेम्स बाँडच्या 'नो टाइम टू डाय'चा बीजिंग प्रीमिअर रद्द, बाँड सीरिजसाठी चीन मोठी बाजारपेठ

'नो टाइम टू डाय' अमेरिकेत 10 एप्रिल आणि भारतात 8 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.

दिव्य मराठी वेब टीम

Feb 18,2020 04:45:00 PM IST


हॉलिवूड डेस्कः कोरोना व्हायरसचा फिल्म इंडस्ट्रीवर परिणाम होताना दिसतोय. हॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मालिकांपैकी एक असलेल्या जेम्स बाँडच्या 'नो टाइम टू डाय' या चित्रपटाचा बीजिंग प्रीमियर रद्द करण्यात आला आहे. इंग्रजी वेबसाइट व्हेरायटीच्या मते, या व्हायरसमुळे प्रमोशनल टूर देखील थांबविण्यात आला आहे.

'नो टाइम टू डाय' अमेरिकेत 10 एप्रिल आणि भारतात 8 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये गेल्या महिन्यापासून सिनेमा बंद आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार सिनेमागृह सुरू झाले तरी चायनीज चाहते चित्रपटातील कलाकारांना प्रमोशन करताना बघू शकणार नाहीत, कारण या काळात सर्वांना चीनपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय फेब्रुवारी महिन्यात चीनमधील अनेक चित्रपटांचे प्रदर्शन कोरोना व्हायरसमुळे अडकले आहे.

बाँड सीरिजसाठी चीन चांगली बाजारपेठ आहे


वेबसाइटच्या मते, चीनचे फिल्म मार्केट बाँड सीरिजच्या चित्रपटांसाठी मोठी बाजारपेठ मानली जाते. सीरिजचा मागील चित्रपट ‘स्पेक्टर’ने ग्रॉस 84 मिलियन डॉलरची कमाई केली होती. चित्रपटाचा प्रख्यात अभिनेता डॅनियल क्रेगचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘नाईव्स आउट’ चीनमध्ये चांगला गाजला. चित्रपटाने ग्रॉस 28 मिलियन डॉलर्सची कमाई केली होती.

14 वर्षांपासून एजंट 007ची भूमिका साकारत आहे डेनियल


या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा 51 वर्षीय डॅनियल क्रेग सर्वात प्रदीर्घ काळ काम करणारा बाँड अभिनेता ठरला आहे. 2005 पासून त्याने 4 जेम्स बाँड चित्रपट केले आहेत. आगामी ‘नो टाइम टू डाई’ हा त्याचा पाचवा बाँडपट आहे.

कोरोना व्हायरसमुळे 1775 जणांचा मृत्यू, 71 हजारांहून अधिक ग्रस्त


चीनच्या वुहान येथून आलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात 1775 लोकांचा बळी घेतला आहे. त्याच वेळी, 71 हजार लोक कोरोना व्हायरसने ग्रस्त असल्याचे सांगितले जाते. चीनबाहेर पाच लोकांचा मृत्यू झाला आहे.

X