आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेम्स बाँडच्या अॅश्टन मार्टीन डीबी-5 कारला लिलावात मिळाले विक्रमी 45 कोटी रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेक्रामेंटो - जेम्स बाँडच्या चित्रपटात प्रमोशनसाठी वापरण्यात आलेल्या १९६५ च्या एस्टन मार्टिन डीबी- ५ कार अवघ्या पाच सेकंदांपेक्षाही कमी काळात लिलावात विकली गेली. लिलावात या कारला विक्रमी ४४.९५ कोटी रुपये (६,३८५,००० डॉलर) एवढी किंमत मिळाली. यामुळे ही कार जगातील सर्वात महागडी कार ठरली आहे. कारची विक्री करण्याआधी तिला प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. लिलावात सात पक्षांनी भाग घेतला. त्यातील सहा लिलावात सहभागी राहिले, तर एकाने फोनवरून बोली लावली. ही कार बाँडच्या एका चाहत्याने ४४.९५ कोटी रुपयांत खरेदी केली. आधी ही कार अब्जाधीश आणि टोरी पार्टीचे लॉर्ड बमफोर्ड यांच्याकडे होती.