आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WorldCup/ सुपर ओव्हरमध्ये नीशमने छक्का मारताच त्याच्या प्रशिक्षकाचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेलिंग्टन- न्यूजीलंडचा ऑलराउंडर जेम्स नीशमच्या लहानपणीचे प्रशिक्षक डेविड जेम्स गॉर्डन यांचे निधन झाले. इंग्लंडविरुद्ध वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये सुपर ओव्हरदरम्यान जोफ्रा आर्चरच्या दुसऱ्या चेंडूवर नीशमने छक्का लगावला. चेंडू बाउंड्रीच्या पलिकडे जाताच गॉर्डन यांना ह्रदय विकाराच झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांची मुलगी लियोनीने सांगितले की, न्यूजीलंडच्या स्थानीक वेळेनुसार सोमवारी सकाळी नीशमने सुपर ओव्हरमध्ये दुसरी चेंडूवर छक्का लगावला आणि त्याचदरम्यान गॉर्डन यांचे निधन झाले.  


नीशमने ट्वीट करू गॉर्डन यांना श्रद्धांजली दिली
इंग्लंड-न्यूजीलंडचा फायनल सामना बरोबरीने सुटला. त्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली, त्यातही सामना बरोबरीने सुटला पण इंग्लडने जास्त बाउंड्री लगावल्याने त्यांना विजेता घोषित करण्यात आले.


नीशमने ट्वीट करून गॉर्डन यांना श्रद्धांजली दिली. त्याने लिहीले, ‘डेव गॉर्डन, माझे शाळेतील शिक्षक, कोच आणि मित्र. या खेळावर तुमचे खूप प्रेम होते. मी खूप भाग्यवान आहे की, तुमच्या हाताखील मला शिकायला मिळाले.’ नीशमने वर्ल्ड कपमध्ये 15 विकेट घेतल्या आणि 232 रन काढले.

 

Dave Gordon, my High School teacher, coach and friend. Your love of this game was infectious, especially for those of us lucky enough to play under you. How appropriate you held on until just after such a match. Hope you were proud. Thanks for everything. RIP

— Jimmy Neesham (@JimmyNeesh) July 17, 2019


नीशमच्या ट्वीटवर लियोनीने आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, ‘यामुळे माझे वडील खूप खूश झालेत. नीशमबद्दल त्यांच्या मनात एक वेगळे स्थान होते.’ गॉर्डनने ऑकलंड ग्रामर स्कूलमध्ये एक शिक्षक होते, तसेच ते क्रिकेट आणि हॉकीचे कोचदेखील होते. त्यांच्या 25 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी नीशम, लॉकी फर्गुसनसहित अनेक क्रिकेटर्सना प्रशिक्षण दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...