आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीर : ‘कलम ३५ अ’मध्ये फेरफार स्फाेटाच्या आगीसारखा : मुफ्ती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरमध्ये लागू कलम ३५ अमध्ये फेरफार करण्यावरून केंद्राला धमकी दिली आहे. आपला पक्ष पीडीपीच्या २० व्या स्थापना दिनानिमित्त आयाेजित कार्यक्रमात मुफ्ती म्हणाल्या, आम्ही केंद्र सरकारला सांगू इच्छिताे की, ‘कलम ३५ अ’मध्ये फेरफार करणे, स्फेाटकाच्या साठ्याला आग लावण्यासारखे हाेईल. जे काेणी याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतील केवळ त्यांचेच हात भाजणार नाहीत तर संपूर्ण शरीर भस्मसात हाेईल.


स्फाेटाशी खेळण्याचे धाेकादायक परिणाम हाेतील. यावर काेणी नियंत्रण आणू शकणार नाही. राज्याच्या विशेष दर्जासाठी आपण तुरुंगात जाण्यासही तयार आहाेत. मुफ्ती यांनी माजी मुख्यमंत्री व नॅशनल काॅन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांच्यावरही निशाणा साधला. उमर यांनी ‘कलम ३५’बाबत म्हटले हाेते की, सर्वाेच्च न्यायालयाचा निकाल त्यांच्या पक्षाला मान्य असेल. मेहबूबा मुफ्ती यांनी एनआयएच्या छाप्यांबाबतही सांगितले की, आमचा पक्ष व मंत्र्यांनी काेणताही भ्रष्टाचार केला नाही. आम्ही या छाप्यांना भिणार नाही. पीडीपी- भाजप आघाडी संपुष्टात आल्यानंतर मुफ्तींचे भाजपसोबत संबंध ताणले गेले आहत.


 

पाकिस्तानी अतिरेकी  दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्याच्या तयारीत
केंद्र सरकाने जम्मू- काश्मीरमध्ये लष्कराच्या १० हजार अतिरिक्त जवानांची तैनाती सुरू झाली आहे. एका अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की, पाकिस्तानी दहशतवादी संघटना हल्ल्याचा कट रचत आहे. त्यामुळे लष्करातील अतिरिक्त जवानांच्या तैनातीचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डाेभाल यांनी नुकतेच जम्मू-काश्मीरमध्ये राज्य सुरक्षेबाबत दहशतवादविराेधी पथकासाेबत आढावा बैठक घेतली. यानंतर केंद्र सरकारने निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...