आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मिरात सैन्य भरती; रियासीमध्ये तरुणांची झुंबड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी निर्बंध असूनही भारतीय लष्करात भरती होण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण आकर्षित झाले आहेत. रियासी शहराच्या बाहेरील भागात ३ सप्टेंबरपासून सैन्य भरती सुरू आहे. ती सोमवारी संपणार आहे. या भरतीसाठी आतापर्यंत २९ हजार काश्मिरी तरुणांनी आपली नावे नोंदवली आहेत. भरती होण्यासाठी आलेल्या एका तरुणाने सांगितले, मला लहानपणापासून सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. यामुळेच मी येथे आलो आहे. दरम्यान, काश्मिरी युवकांचा भारतीय लष्करात सामील होण्यासाठी मिळणारा हा प्रतिसाद शांततेच्या दृष्टीने चांगले संकेत असल्याचे मानले जाते. 

पाकच्या गोळीबाराला भारतीय जवानांचे प्रत्युत्तर
राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी व नौशेहरा सेक्टरमध्ये रविवारी सकाळी १० च्या सुमारास पाक लष्कराने भारतीय सैन्यांच्या चौक्यांवर व गावांवर गोळीबार केला आणि उखळी तोफांचा मारा केला. भारतीय सैन्याने यास जोरदार प्रत्युत्तर दिले.

बातम्या आणखी आहेत...