आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सात अतिरेक्यांना शोधा अन् सरकारी नोकरी मिळवा, जम्मू-काश्मीर पोलिसांची अनोखी ऑफर  

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू  - जम्मू-काश्मीर पोलिसांनी सात वाँटेड अतिरेक्यांचे पोस्टर जारी केले आहे. त्यावर या अतिरेक्यांना पकडणाऱ्यांना सरकारी नोकरी आणि लाखो रुपये रोख बक्षीस मिळवा, अशी ऑफर देण्यात आली आहे. किश्तवाडमध्ये पोलिसांनी या सात अतिरेक्यांची छायाचित्रे आणि माहिती असणारे मोठे बॅनर्स लावले आहेत. त्यावर संपर्कासाठी  मोबाइल क्रमांक दिले असून माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे पोस्टरवर नमूद केले आहे. 


किश्तवाडचे एसएसपी शक्ती पठाण यांनी सांगितले, यापैकी सहा अतिरेकी हिजबुल मुजाहिदीनचे तर एक लष्कर-ए-तोयबाचा आहे. महंमद अमीन ऊर्फ जहांगीर सरुरी, रियाज अहमद ऊर्फ हजारी, उस्मान ऊर्फ ओसामा, लमुदस्सीर हुसेन, तालिब हुसेन गुज्जर, जमालदीन आणि जुनैद अक्रम अशी त्यांची नावे आहेत.