आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 वर्षांपुर्वी या जवानाने पाकिस्तानात घुसून शुत्रूंवर केला होता हल्ला, काश्मीर आतंकवाद्याशी लढताना पडला धारातिर्थी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क/जम्मू. संरक्षणदलाने सोमवारी कुपवाडाच्या तंगधार सेक्टरमध्ये एलओसीजवळ 3 आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. यापुर्वी रविवारीही आतंकवादी मारले गेले होते. या ऑपरेशनमध्ये गुरदासपुर जिल्ह्याचे घुम्मणकलां गावातील कोटला खुर्दचे जवान संदीप सिंह शहीद झाले. संदीप सिंह हे सर्जिकल स्ट्राइकमध्ये पॅरा कमांडोच्या दलामध्ये सहभागी होते. 


- ऑपरेशन सोमवार रात्रीपर्यंत सुरु होते. तंगधारमध्ये शनिवारी आतंकवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. या दरम्यान पाकिस्तानी रेंजरही त्यांना कव्हर फायर देत होते. यानंतर ऑपरेशन सुरु होते. रविवारी जवानांनी दोन आतंकवाद्यांना मारले होते.
- यानंतर सोमवारी अजून तीन आतंकवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. ऑपरेशनमध्ये आतंकवादी मारले गेल्याचे ऐकल्यानंतर स्थानिक युवकांनी तिथे पोहोचून सुरक्षादलांवर दगडफेक सुरु केली. या ऑपरेशन दरम्यान संदीप सिंह शहिद झाले, ते 2007 मध्ये लष्करात भरती झाले होते. 
- त्यांची ड्यूटी 4 पॅरा उधमपुरमध्ये होती. तंगधारमध्ये घुसखोरीच्या सूचनेनंतर त्यांना तिथे पाठवण्यात आले होते. त्यांच्या कुटूंबात वडील जगदेव सिंह, आई कुलविंदर कौर, पत्नी गुरप्रीत कौर आणि पाच वर्षांचा मुलगा आहे. त्यांचे पार्थिव मंगळवारी गावात नेण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...