आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक कोटी रुपये कॅश घेऊन जाणारी व्हॅन 500 मीटर खोल दरीत कोसळली, 4 बँक कर्मचाऱ्यांचा मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या बँकेची एक कॅश व्हॅन कर्मचाऱ्यांसह 500 मीटर खोल दरीत कोसळली. ही घटना बानी शहराजवळ सोमवारी रात्री घडली असून मंगळवारी समोर आली आहे. अपघात घडला त्यावेळी व्हॅनमध्ये एक कोटी रुपये रोख रक्कम आणि चार बँक कर्मचारी होते. या भीषण अपघातात सर्वांचाच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॅनमध्ये एक कोटी रुपये होते. ही व्हॅन बानी शहरापासून जवळपास 17 किमी अंतरावर घडली. मृतांमध्ये ड्रायव्हर विक्रम सिंह, गनमॅन यश पाल, हरबंश सिंह आणि कॅशियर केवल शर्मा यांचा समावेश आहे. दरम्यान, अपघातग्रस्त व्हॅनमधून चारही मृतदेह बाहेर काढण्यात आले. तसेच व्हॅनमध्ये सापडलेली संपूर्ण रक्कम जम्मू काश्मीर बँकेच्या बानी शाखेला सुपूर्द करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...