आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu Kashmir Encounter: Jammu Kashmir Jaish E Mohammed Terrorists Awantipora Encounter Today Updates

मागील 7 दिवसांत दहशतवाद्यांसोबत तिसऱ्यांदा चकमक, अवंतिपोरामध्ये जैश कमांडरसह 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दक्षिण काश्मीरमध्ये मागील 7 दिवसात झालेल्या चकमकींमध्ये 8 दहशतवादी मारले तर 2 जवान शहीद झाले

पुलवामा- दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपोरा भागात आज(शनिवार) सुरक्षादल आणि दहशतवाद्यामध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे 3 दहशतवादी मारले गेले आहेत. यातील एक जैशचा एरिया कमांडर असल्याची माहिती आहे.  जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, सुरक्षादलाला पक्की माहिती मिळल्यानंतर, जैश-ए-मोहम्मदचा कमांडर आणि दोन इतर दहशतवाद्यांना घेरण्यात आले होते. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षादलानेही गोळीबार सुरू केला, यात तीन दहशतवादी मारले गेले.

सकाळी सुरू झाले सर्च ऑपरेशन

शनिवारी सकाळी राष्ट्रीय राइफल्स (आरआर), जम्मू-काश्मीर पोलिसचे स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआरपीएफ) च्या संयुक्त दलाने पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागाजवळील हरिपिरगममध्ये सर्च ऑपरेशन केले. सुरक्षा दलाने गावातील सर्व रस्ते बंद करुन गावातील घरांमध्ये सर्चींग केली. या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.


जम्मू-काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, चकमकीत 3 दहशतवादी मारले गेले. मृतांमध्ये जैशचा स्वयंभू काश्मीर चीफ कारी यासिर सामील होता. आम्हाला सूचना मिळाली की, तो श्रीनगरमध्ये मोठा आयईडी विस्फोट करण्याच्या तयारीत आहे. इतर दोघांची ओळख पटवणे सूरू आहे. तर, चिनार कॉर्प्सचे कमांडर लेफ्टिनेंट जनरल केजेएस ढिल्लन म्हणाले की, आम्हाला सकाळी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांबद्दल सूचना मिळाली होती. हे दहशतवादी 26 जानेवारील मोठी कारवाई करण्याच्या तयारीत होते. 

मागील 7 दिवसात मोठ्या 3 चकमकी

दक्षिण काश्मीरणध्ये मागील 7 दिवसात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये तीन मोठ्या चकमकी झाल्या. 21 जानेवारीला पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपोरामध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले आणि एक जवान शहीद झाला. त्यानंतर शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले होते.