आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातील एका गावात मंगळवारी सकाळी चकमक उडाली. यात प्रत्युत्तर देताना सुरक्षा रक्षकांनी 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. सोबतच, एक जवान शहीद झाला असून इतर 3 जण जखमी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी श्रीनगरपासून 60 किमी दूर नदिगाम गावात दहशतवादी दबा धरून बसल्याची माहिती मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे लष्करी जवान, पोलिस आणि केंद्रीय राखीव दलाच्या संयुक्त दलाने भल्या पहाटे शोध मोहिम राबवली. त्याच दरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि चकमक सुरू झाली.
कर्नल राजेश कालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी शोपिया जिल्ह्यातील रेब्बन भागात सुद्धा अशाच प्रकारची एक चकमक उडाली होती. त्यामध्ये अल-बद्र दहशतवादी संघटनेच्या 2 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते. त्याच दिवशी दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केला होता. त्यामध्ये एक जवान शहीद झाला. यासोबत 1 नोव्हेंबर रोजी त्राल परिसरात सुरक्षा रक्षकांनी मसूद अजहरच्या पुतण्यासह तीन दहशतावाद्यांना कंठस्नान घातले. तसेच मोठ्या प्रमाणात दारु-गोळा जप्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.