आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा दहशतवाद्यांना काश्मिरात कंठस्नान शोपियांत भयंकर चकमक, एक जवान शहीद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलांशी झालेल्या भयंकर चकमकीत सहा दहशतवादी मारले गेले. या कारवाईत ३४-राष्ट्रीय रायफल्सचा जवान नजीर अहमद शहीद झाला. दुसरा एक जवान जखमी झाला आहे. दरम्यान, ही कारवाई सुरू असताना दगडफेक करणाऱ्या नागरिकाचा सुरक्षा दलांशी झालेल्या संघर्षात मृत्यू झाला. इतर १५ लोक जखमी झाले.

श्रीनगरमधील सुरक्षा दलाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले, दक्षिण काश्मीरमध्ये शोपियांत सुरक्षा दलांनी गुप्त माहितीवरून कारवाई केली. शनिवारी रात्री उशिरा हिपुरा बाटागुंड भागात दलाने तपास मोहीम सुरू केली. पहाटेपर्यंत या भागाला सुरक्षा दलांनी वेढा दिला. यानंतर एका इमारतीत लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत सहा दहशतवादी मारले गेले.

दहशतवाद्यांचे समर्थक रस्त्यावर, सुरक्षा दलांवर दगडफेक
कारवाईत सहा दहशतवादी मारले गेल्याचे कळताच शोपियांतील बाटापोरा कप्रान भागातील युवक आणि महिलांसह अनेक नागरिक रस्त्यावर उतरले. यातील काही जणांनी सुरक्षा दलांवर दगडफेक सुरू केली. या लोकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलाने अश्रुधुराचा वापर केला, हवेत गोळीबारही केला. यात नोमान अशरफ बट या युवकाचा मृत्यू झाला. तर, १५ हून अधिक लोक जखमी झाले. दरम्यान, शोपियां आणि कुलगाममधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...