आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मिरात 2 दहशतवाद्यांना अटक, Encounter मध्ये 1 जवान शहीद, 5 जण जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या बटमालू येथील देयेरवानी परिसरात रविवारी 2 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तत्पूर्वी पोलिसांनी दहशतवाद्यांना घेराव टाकला तेव्हा चमक उडाली होती. या चकमकीत एक जवान शहीद झाला असून इतर 5 जण जखमी आहेत. पोलिस, लष्कर आणि स्पेशल ऑपरेशन्स दलाने संयुक्तरित्या ही कारवाई केली. परिसरात एकूण 5 दहशतवादी लपले होते. परंतु, 3 दहशतवादी जखमी झाल्यानंतर फरार झाले. 


याबाबत सविस्तर वृत्त असे की रविवारी सकाळी पोलिसांना बटमालू येथे 5 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतरच संयुक्त दलाने परिसराला घेराव टाकला होता. दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकावर फायरिंग केल्याने पोलिसांनी प्रत्युत्तर दिले आणि चकमक उडाली. यात स्पेशल ऑपरेशन्स टीमचा एक जवान शहीद झाला आहे. तसेच इतर 3 जण जखमी आहेत. त्यामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) 2 जवानांचा समावेश आहे. सुरक्षिततेच्या कारणांसाठी परिसरात मोबाईल इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...