आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu Schools, Markets And Phones Banned, Migration Of People From The Gulf For Treatment And Education

जम्मूत शाळा, बाजारपेठ आणि फोनवरील बंदी पूर्ण उठली, उपचार आणि शिक्षणासाठी खाेऱ्यातील लोकांचे स्थलांतर 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र वैष्णोदेवीचे आहे. येथे येणारे भाविक ऑगस्टमध्ये घटले आहेत. जुलैमध्ये ९ लाख लोक आले होते. ऑगस्टमध्ये केवळ ६ लाख आले. ही संख्या गेल्या ऑगस्टपेक्षा ९० हजार कमी आहे. कटराच्या ज्या हॉटेल्समध्ये ३० खोल्या बुक होत होत्या, तिथे ५ जण थांबले आहेत.  - Divya Marathi
छायाचित्र वैष्णोदेवीचे आहे. येथे येणारे भाविक ऑगस्टमध्ये घटले आहेत. जुलैमध्ये ९ लाख लोक आले होते. ऑगस्टमध्ये केवळ ६ लाख आले. ही संख्या गेल्या ऑगस्टपेक्षा ९० हजार कमी आहे. कटराच्या ज्या हॉटेल्समध्ये ३० खोल्या बुक होत होत्या, तिथे ५ जण थांबले आहेत. 

  आई म्हणाली-कागदपत्रे घ्या, चला काश्मीरला जाऊ,नाही गेलाे ते बरेच...   ३७० कलमावरील निर्णयानंतर काही दिवसांनी जम्मूतील फोनबंदी उठवण्यात आली होती. शाळा-महाविद्यालयेही आठवडाभरात उघडली होती. मात्र, जम्मूच्या काही भागांत सुरक्षा दलांचा पहारा अद्यापही आहे. काश्मिरी मुस्लिमांची संख्या जास्त असलेला हा भाग आहे. जम्मूत गेल्या आठवड्यात काही अवधीसाठी मोबाइल इंटरनेट सुरू केले होते. मात्र, अफवा पसरवल्या जात असल्याने पुन्हा बंद केले. उज्मा त्याच वजारत रोड भागात राहते, जिथे ३ लोकांचा खून केल्याची अफवा पसरली होती. उज्मा यांच्यानुसार, ५ ऑगस्टला स्थिती बिघडली तेव्हा आई म्हणाली, कागदपत्रे पॅक कर, आपण आजच काश्मीरला जाऊ. बरे झाले तिथे गेलो नाही.  खोऱ्यातून जम्मूला येणारी विमाने आणि एखाद्- दुसरी टॅक्सी लोकांनी खचाखच भरली जात आहे. हे लोक मुले आणि ज्येष्ठांना घेऊन जम्मूत स्थलांतरित होत आहेत. मुलांचे शिक्षण काश्मीरमध्ये शक्य नाही किंवा ज्येष्ठांवरील काश्मिरात उपचार घेणे शक्य नाही,असे लोक येथे येत आहेत. ज्यांचे नातेवाईक जम्मूत आहेत,अशा नागरिकांचा यात समावेश आहे. रुखसाना सोपोरमध्ये राहते, तिची १२ वीची परीक्षा आहे. गुणांवर परिणाम होऊ नये यासाठी ट्यूशनसाठी ती जम्मूत आली आहे. काश्मीर खोऱ्यातील वाईट स्थितीचा फटका जम्मूच्या व्यापाऱ्यांनाही बसत आहे. महिनाभरात सुमारे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. काश्मीरला माल पुरवठा करणाऱ्यांचा यात समावेश आहे. एवढेच नव्हे, तर कोट्यवधी लोकांचा खोऱ्यातील पैसा अडकला आहे. ब्राहमना इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष ललित महाजन यांच्यानुसार, माल पाठवायचा होता, नव्या ऑर्डरवर फोनविना निर्णय घेणे सोपे नाही. यामुळे काम ठप्प आहे.जम्मूमध्ये काश्मिरी सफरचंदांची पहिली खेप ऑगस्टपर्यंत पोहोचते. जम्मू स्थानकावर घरी परतणाऱ्या जवानाकडे सफरचंदाची एक पेटी अवश्य असते. एवढेच नव्हे, तर व्यापारी जम्मूच्या राजौरी,पुंछ किंवा डोडाला सामान पाठवत होते. तेही फोन बंद असल्यामुळे नुकसान सोसत आहेत. एकीकडे काश्मीरमध्ये गुलमर्ग, पहलगामसारखी पर्यटनस्थळे ओस पडली, तर जम्मूचीही स्थिती दयनीय आहे. वैष्णोदेवीच्या यात्रेकरूंची संख्याही कमी झाली आहे. जम्मूत मात्र ३७० वरून महिनाभर उत्सव सुरू आहे.  वैष्णोदेवी : गतवर्षापासून ९० हजार भाविक घटले

बातम्या आणखी आहेत...