आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1500 KM पार करून विवाहासाठी पोहोचली नववधू..सोबत आणले केवळ 7 पाहुणे, नधुपित्याने नवरदेवाला मागितली सॅलरी स्लिप...नंतर झाले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमशेदपूर (झारखंड)- उत्तराखंडमधील बागबेडाहून ऋषिकेशला (जमशेदपूरपासून 1500 किलोमीटर अंतरावर) विवाहासाठी आलेल्या वधू पक्षातील नऊ जणांची पोलिसांनी सुटका केली. सगळ्यांना वरपक्षाकडील लोकांनी घरात डांबून ठेवले होते. मंगळवारी ऋषिकेशमध्ये शिवाजी नगर पोलिस स्टेशनच्या पथकाने छापेमारी करून सगळ्यांची सुटका केली. मुलगा इंजिनिअर असल्याचे वरपक्षाकडील लोकांनी सांगितले होते. परंतु वधूपित्याने मुलाला सॅलरी स्लिप मागताच वरपक्षाकडील लोकांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. हुंडा मागू लागले. हा सगळा प्रकार पाहून नवरीने विवाह करण्यास स्पष्ट नकार दिला. नंतर...

नवरीने विवाहास नकार दिल्याने वरपक्षाकडील लोक नाराज झाले. त्यांनी नववधूसह तिच्या नातेवाईकांना आपल्या घरात डांबून ठेवले. नववधूने सोमवारी रात्री स्वत:ची सुटका करून ऋषिकेश पोलिस स्टेशन गाठले. एसएसपी अनूप बिरथरे यांना सर्व प्रकार सांगितला. एसएसपीने उत्तराखंड पोलिसांशी संपर्क साधून वधूपक्षाकडील लोकांची सुटका केली.

 

पीडित मुलीसह तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून ऋषिकेश पोलिस स्टेशनमध्ये वरपक्षाकडील नागरिकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. वरपक्षाकडील नागरिक अद्याप फरार आहेत. पोलिस संरक्षणात पीडित मुलीसह तिच्या नातेवाईकांना मंगळवारी रात्री टाटानगरच्या एक्स्प्रेसने रवाना करण्यात आले. बागबेडा पोहोचल्यानंतर मुलीने 'दैनिक भास्कर'ला संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

 

लोभी नवरामुलगा आणि त्याच्या नातेवाईकांनी केला अत्याचार
पीडितेने सांगितले की, नवरामुलगा चांगला आहे. इंजिनिअर आहे. आपली मुलगी सुखात राहील, असे समजून आई-वडिलांनी विवाह निश्चित केला होता. परंतु हुंड्यासाठी लोभी नवरामुलगा आणि त्याच्या नातेवाईकांनी आमच्यावर प्रचंड अत्याचार केले. त्या घरात माझा विवाह झाला असता तर माझे संपूर्ण जीवन उद्‍वस्त झाले असते. मी एमएससी उत्तीर्ण आहे. नवरा मुलगा सिव्हिल इंजिनिअर असल्याचे खोटे सांगण्यात आले होते.

 

आई-वडिलांसह आमच्या कुटुंबातील नऊ जण 8 मार्चला ऋषिकेशला पोहोचले होते. परंतु आपण ज्यांना देव समजून येथे अालो आणि ते दानव निघाल्याचे समजले. आई-वडिलांनी नवर्‍या मुलाला सॅलरी स्लिप मागितली. त्यावर तो त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. मुलाकडील लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे आम्हाला समजले होते. त्यांचा अवैध धंदा आहे. हुंडा न घेता विवाह करणार असल्याचे त्यांनी सुरुवातीला सांगितले होते. परंतु नंतर त्यांना वडिलांकडे दीड लाख रुपये हुंडा मागितला. तोही माझ्या आई-वडिलांनी त्यांना दिला. परंतु  मुलाकडील लोकांची वृत्ती लक्षात आल्यानंतर मी विवाहास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर मुलाकडील लोक शिविगाळ करू लागले. एवढेच नाही तर त्यांना आम्हाला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर घरात डांबून ठेवले. 9 मार्चला ते जबरदस्तीने माझा विवाह करणार होते. मला एका खोलीत ठेवले होते.  संधी पाहून ‍मी तिथून पळ काढला. माझ्याकडे केवळ पर्स होती. परंतु त्यात पैसे नव्हते. अर्धा किलोमीटर जंगलातून धावतच ऋषिकेशला पोहोचली. पोलिसांना आपबिती सांगितली.

बातम्या आणखी आहेत...