आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू पिऊन आईला मारायचा बाप, मुलाने काठीने मारून केली हत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरसावां(जमशेदपूर)- खरसावा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कुम्हार रीडिंग गावात अल्पवयीन मुलाने आपल्याच पित्याची लाठीने मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, वडील रोज दारून पिऊन घरी यायचे आणि आईला मारहाण करायचे. रविवारीदेखील असेच झाले, त्यामुळे रागात येऊन आरोपी मुलाने लाठ्याने वडिलांना मारून त्यांची हत्या केली.


घरी आल्यावर लहान भावाने मारहाणीची माहिती दिली
कुम्हार रीडिंग गावातील 45 वर्षीय राजेन्द्र कुम्हार दारूच्या नशेत घरी पोचले. त्यांनी पत्नी तुलसीसोबत वाद घातला आणि मारहाण केली. त्यानंतर ते झोपी गेले. त्यांच्या या भांडणादरम्यान राजेन्द्र कुम्हारचा 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा कुठेतरी गेला होता. त्यावेळी 12 वर्षांचा लहान भाऊ सोमा घरीच होता आणि तो आई-वडिलांचे भांडण पाहत होता. दुपारी 3 वाजता मोठा मुलगा घरी आला. त्यानंर लहान भावाने वडिलांनी आईला मारल्याची माहीती मोठ्या भावाला दिली. त्यानंतर मोठ्या भावाने लाठीने वडिलांवर हल्ला चढवला. 

 

या घटनेत वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. पण मुलाने सांगितले की, त्याला वडिलांच्या पायावर मारायचे होते, पण त्यांनी तोंडावरून चादर घेतल्यामुळे त्याला तोंड असल्याचे समजले नाही. सूचना मिळताच खरसावा पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून त्याला रिमांड होममध्ये पाठवण्याची तयारी सुरू आहे. 

बातम्या आणखी आहेत...