आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी 5 पोलिस कर्मचाऱ्यांची केली हत्या, नंतर त्यांची हत्यारे घेऊन झाले पसार...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरायकेला(झारखंड)- येथील तिरूलडीह परिसरात शुक्रवारी संध्याकाळी नक्षलवाद्यांनी 5 पोलिस जवानांची हत्या केली आहे. घटनेनंतर नक्षली पोलिसांकडील हत्यारेही घेऊन गेले आहेत. घटना झाल्यापासून एक जवान बेपत्ता झाला आहे. तुर्तास नक्षलवाद्यांचा तपास सुरू आहे.


सहा गाड्यांवर आले होते नक्षली
स्थानिकांनी सांगितल्यानुसार, सहा पोलिस कर्मचारी कुकड़ू गावत काही कामानिम्मीत गेले होते. त्यानंतर ते गावातील बाजार काही खरेदी करण्यासाठी गेले, यादरम्यान सहा गाद्यांवरून नक्षलवादी आले आणि त्यांनी पोलिसांवर अंदाधुद गोळीबार सुरू केला. यात पाच पोलिस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटना झाल्यानंतर नक्षली पोलिसांचे हत्यारे घेऊन पळून गेले.