आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jamui Dm Dharmendra Kumar Gaurds Stopped Forceful Enter Of His Wife To His Govt Residence. Wife With Mother Sat On Dharna In Front Of House, Divorce Case In Family Court

कलेक्टर पतीच्या घराबाहेर पत्नीचा हायव्होल्टेज ड्रामा, सुरक्षा रक्षकांनी घरात जाण्यास रोखले, मग पत्नीने घराबाहेरच दिले धरणे..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमुई(बिहार)- कलेक्टर धर्मेंद्र कुमार यांची पत्नी वंशना सिंह तिच्या आई सोबत धर्मेंद्र यांच्या सरकारी निवास्थनाच्या बाहेर धरण्यावर बसली. त्याना त्यांच्या पतिसोबत राहायचे आहे पण त्यावेळी धर्मेंद्र घरी नव्हते. त्यानंतर सकाळी 8 वाजल्या पासून घराबाहेर हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. वंशना सरकारी निवास्थानाच्या मुख्य दारा बाहेर कार घेउन गेल्या. त्यांना आतमध्ये जायचे होते पण सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत जाऊ दिले नाही. वंशना यांनी सांगितले- पतिने घटस्पोटाचा अर्ज दाखल केला आहे.

 

 ती खुप हायप्रोफाइल आहे, अॅडजस्ट करू शकत नाहीये

घटस्पोटाच्या अर्जाच त्यांनी म्हटले आहे की, "वंशना खुप हायप्रोफाइल आहे. माझ्या कुटूंबीयांसोबत अॅडजस्ट करू शकत नाहीये." त्यांनी 7 मार्च 2018 ला पटनाच्या फॅमिली कोर्टात घटस्पोटाचा अर्ज दाखल केला आहे. फॅमिली कोर्टाच्या जजने सुनावनी दरम्यान सांगितले की, तुम्ही दोघे एकदा आपसात बोलून प्रकरण मिटवू शकता त्यावर वंशना म्हणाल्या की, "त्यासाठीच मी त्यांच्या घरी बोलायला आणि सोबत राहायला गेले होते, पण त्यांना मला भेटायला सुद्धा वेळ नाहीये."

 

व्हिडीओ बनवून सोशल मिडियावर केला व्हायरल...
सकाळी 8.15 वाजता गोपनीय गेटसमोर वंशना आणि त्यांची आई धरण्यावर बसल्या. मिडियामधल्या कोणालाच आतमध्ये जायची परवानगी नसल्यामुळे वंशना यांनी त्यांचा व्हिडीओ बनवून सोशल मिडीयावर व्हायरल केला.

 

वंशना यांनी दाखल केली हुंडाबळीची तक्रार 
वंशना आणि धर्मेंद्र यांच्यात अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहे. धर्मेंद्र यांनी न्यायालयात घटस्पोटाचा अर्ज दाखल केला आहे. त्याआधी वंशना यांनी धर्मेंद्र यांच्या विरुद्ध हुंडाबळीची तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर त्यांनी वंशना सोबत राहणार नसल्याचे सांगितले. तेव्हापासून त्यांच्यातला वाद वाढत गेला.


न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल 
न्यायालयात या प्रकरणाची सुनावनी सुरू आहे. वंशना यांनी आईपीसी सेक्शन 498-ए अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. प्रकरणाचा निर्णय येने बाकी आहे, आणि जो निर्णय येईल तो मान्य असेल. - धर्मेंद्र कुमार, कलेक्टर, जमुई.

 

बातम्या आणखी आहेत...