आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेनेरिक मेडिकल आता बंधनमुक्त, तुम्हीही मोदी सरकारकडून मिळवू शकता 2.5 लाखाचे अनुदान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हीही रोजगाराच्या शोधात असाल तर पंतप्रधान जन औषधी योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सरकार 1500 नवीन सेंटर उघडण्याच्या तयारीत आहे. या सेंटरच्या माध्यमातून सरकार स्वस्तामध्ये जेनेरिक औषधी विकत आहे. या स्कीम अंतर्गत जन औषधी सेंटर उघडल्यास मोदी सरकारकडून 2.5 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे.


यापूर्वी सरकार या स्कीम अंतर्गत फक्त बीफार्मसी आणि एम फार्मसी केलेल्या तरुणांना सेंटर उघडण्याची परवानगी देत होते परंतु आता या डिग्रीशिवाय तुम्ही स्टोअर उघडू शकता. या सेंटरमधून होणाऱ्या औषधांच्या विक्रीवर सरकार 20 टक्के कमिशन देते. आज आम्ही तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती देत आहोत...


कोणकोण उघडू शकते हे स्टोअर
- कोणताही फार्मासिस्ट, डॉक्टर मेडिकल प्रॅक्टिसनरसोबतच सामान्य व्यावसायिक किंवा एखादा NGO सुद्धा जेनेरिक मेडिकल उघडू शकतो.
- एखाद्या एससी, एसटी किंवा अपंग व्यक्ती हे सेंटर उघडण्यास इच्छुक असल्यास त्याला 50 हजार रुपयांपर्यंतची औषधी ऍडव्हान्स दिली जाते.
- राज्यसरकारने नॉमिनेट केलेल्या एजन्सीसुद्धा स्टोअर उघडू शकतात.


कोणकोणते कागदपत्र आवश्यक 
- अॅप्लिकेशन करणाऱ्या व्यक्तीकडे स्वतःचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड असणे आवश्यक आहे.
- कमीत कमी 120 स्क्वेअरफूट जागा असावी. तुमच्याकडे स्वतःची जागा नसल्यास भाड्याने जागा घेऊ शकता परंतु यासाठी व्हॅलिड एग्रीमेंट आवश्यक आहे.
- एखादा एनजीओ अॅप्लिकेशन करत असेल तर त्याला संस्थेचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट देणे आवश्यक आहे.
- या व्यतिरिक्त औषधी ठेवण्यासाठी प्रॉपर रॅक, रेफ्रिजरेटर, ऑफिस टेबल, प्रिंटर, कॉम्प्युटर, इंटरनेट, टेलिफोन कनेक्शन आवश्यक आहे.


कसे कराल अॅप्लिकेशन, किती होतो फायदा 
- तुम्ही janaushadhi.gov.in वेबसाइटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करू शकता. janaushadhi.gov.in वेबसाइटवरून याची संपूर्ण माहिती मिळेल.
- फायद्याचा विचार केल्यास औषधीच्या प्रिंट किमतीवर 20 टक्के फायदा मिळू शकतो.
- या स्टोअरच्या माध्यमातून तुम्ही सुरुवातीला 10 ते 15 हजार रुपयांपर्यंत इनमक करू शकता.

 

बातम्या आणखी आहेत...