Home | National | Other State | Jana Sena MLA candidate Madhusudhan Gupta smashes EVM in Andhra Pradesh

आंध्र प्रदेशात उमेदवाराने ईव्हीएम मशीनच फोडले, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अटक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 11, 2019, 03:43 PM IST

पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू असताना समोर आला धक्कादायक व्हिडिओ

  • Jana Sena MLA candidate Madhusudhan Gupta smashes EVM in Andhra Pradesh

    नॅशनल डेस्क - देशभरातील 20 राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी सुरू झाले. परंतु, याच दिवशी सोशल मीडियावर ईव्हीएम मशीन फोडल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसून येणारी व्यक्ती एक नेता आहे. आंध्र प्रदेशात विधानसभेसाठी उमेदवार असलेल्या या नेत्याने मतदान केंद्रात घुसून ईव्हीएम मशीन तोडले आहे. आंध्र प्रदेशात लोकसभा निवडणुकीसह विधानसभेच्या सर्वच 175 जागांसाठी मतदान सुरू आहेत.


    व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या व्यक्तीचे नाव मधुसुदन गुप्ता असून तो जन सेना पक्षाचा उमेदवार आहे. त्याने मतदान केंद्रात घुसून ही तोडफोड केली. गुप्ता मतदान करण्यासाठी अनंतपूर जिल्ह्यातील गूटी येथील मतदान केंद्रावर पोहोचला होता. याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या ऑन ड्युटी निवडणूक कर्मचाऱ्यांवर तो नाराज झाला. या मतदान केंद्रात लोकसभा आणि विधानसभा मतदार संघांची नावे स्पष्टपणे लिहण्यात आलेली नाहीत अशी त्याची तक्रार होती. यावरून इतका वाद झाला की त्याने ईव्हीएम मशीनच फोडले. या घटनेनंतर गुप्ताला पोलिसांनी अटक केली आहे.

Trending