Home | Gossip | janhavi kapoor's first ever performance in film fare award 2019

'पद्मावत' च्या गाण्यावर जान्हवी कपूरने केला जबरदस्त डान्स तर वडिल बोनी कपूर झाले इमोशनल, व्हिडीओ झाला व्हायरल 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 16, 2019, 10:57 AM IST

सोशल मीडिया यूजर्स करत आहेत जान्हवीच्या डान्सचे कौतुक, म्हणाले - 'तू दूसरी श्रीदेवी आहेस' 

 • janhavi kapoor's first ever performance in film fare award 2019

  मुंबई : जान्हवी कपूरचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर केला गेला आहे. जो खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री 'पद्मावत' चे गाणे 'घूमर' वर जबरदस्त डान्स करत आहे. त्यानंतर वडिल बोनी कपूर मुलीचा धमाकेदार परफॉर्मन्स पाहून इमोशनल होतात आणि आकाशाकडे पाहू लागतात. याव्यतिरिक्त जान्हवी या शोमध्ये 'स्त्री' च्या 'कमरिया' गाण्यावरही डान्स करते.

  'फिल्मफेयर' अवॉर्ड शोमध्ये आहे 'धडक' च्या अभिनेत्रीचा पहिलाच परफोर्मन्स...
  'फिल्मफेयर' अवॉर्ड शोमध्ये जान्हवी कपूरचा हा पहिलाच स्टेज परफॉर्मन्स आहे. या व्हिडिओचा प्रोमो जान्हवीने आपल्या पर्सनल इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केला आहे आणि त्यासोबत कॅप्शन लिहिले, "माझा पहिला फिल्मफेयर परफॉर्मेंस!!!! मला आता धीर धरवत नाहीये की, तुम्ही लोक हे कधी पाहाल." यासोबतच सोशल मीडिया यूजर्स यावर कमेंट्स करून तिचे भरभरून कौतुक करत आहेत. एकाने तरीबी लिहिले, "तू बॉलिवूडची दूसरी श्रीदेवी आहेस." तसेच दुसर्याने इमोशनल कमेंट केली की, 'या शोमध्ये श्रीदेवी यांची उणीव भासत आहे.'

  गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये दिसणार...
  जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये लीड रोल प्ले करत आहे. या त्या लेफ्टनंट गुंजन सक्सेना आहेत, ज्यांनी कारगिल वॉरमध्ये पाकिस्तानची वाईट हालत केली होती. याव्यतिरिक्त तिच्याकडे करण जोहरची फिल्म 'तख्त' देखील आहे. या फिल्ममध्ये तिच्यासोबत रणवीर सिंह, विक्की कौशल, आलिया भट्ट, करीना कपूर खान, भूमि पेडनेकर आणि अनिल कपूरदेखील आहे. ही फिल्म 2020 मध्ये रिलीज होणार आहे.

Trending