आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्स-बॉयफ्रेंड अक्षतसोबत लोणावळ्यामधे हॉलिडे एन्जॉय करत आहे जान्हवी कपूर, फोटोमध्ये दिसले उत्तम बॉन्डिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : जान्हवी कपूर आपला एक्स-बॉयफ्रेंड अक्षत रंजनसोबत लोणावळ्यामधे हॉलिडे एन्जॉय करत आहे. अक्षतसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना जान्हवीने काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवे शेअर केले आहेत. यामध्ये अक्षत आणि जान्हवीचे उत्तम बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. कधी ती जेवणाचा आनंद घेताना दिसत आहे तर कधी लोणावळ्याच्या सुंदर लोकेशनमध्ये फोटोशूट करताना दिसत आहे. जान्हवीने हॉलिडेचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. ज्यामध्ये ती एका मॉलमध्ये जम्पिंग एन्जॉय करताना दिसत आहे.  

सोबत शिकले आहेत अक्षत-जान्हवी... 

अक्षतने बॉस्टनच्या टफ्ट्स यूनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले आहे. तिथूनच जान्हवीनेही आपले शिक्षण पूर्ण केले आहे. अक्षतची श्रीदेवी यांच्यासोबत खूप चांगली बॉण्डिंग होती. अनेक फॅमिली फंक्शनदरम्यानही तो जान्हवीसोबत दिसला होता. मात्र, मध्यंतरी त्यांच्यात वाद होत असल्याची आणि ब्रेकअपच्या बातम्यां ऐकायला मिळत होत्या. पण आता वाटते आहे की, दोघांमध्ये सर्वकाही ठीक आहे.  
 

3 चित्रपटात व्यस्त आहे जान्हवी... 

जान्हवी सध्या तीन चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. अशातच तिने 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल' चे शूटिंग संपवले आहे. याव्यतिरिक्त ती 'दोस्ताना 2' चे शूटिंग करत आहे. या दोन्ही चित्रपटांव्यतिरिक्त जान्हवी मल्टीस्टारर चित्रपट 'तख़्त' मध्ये दिसणार आहे.