आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांचे \'झिंगाट\'स्टाइल वर्कआउट, व्हिडिओ होतोय व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टटेन्मेंट डेस्क: बॉलिवूडमध्ये 'धडक' चित्रपटातून डेब्यू करणारी जान्हवी सध्या आपल्या फिटनेसवर फोकस करताना दिसतेय. नुकताच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये जान्हवी कपूर आणि 'धडक'मध्ये तिचा को-स्टार असलेला ईशान खट्टर 'झिंगाट' गाण्याच्या बीटवर वर्कआउट करत आहेत. जान्हवीने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, 'जैसे ही आप लोगों ने सोचा होगा कि हमसे छुटकारा पा गए... तो हम वापस आ गए!' जान्हवीने असे वर्कआउट करण्यासाठी आता चित्रपटाचे डायरेक्टर शशांक खेतानला चॅलेंज केले आहे. चान्हवीने लिहिले. #झिंगाटवर्कआउट चॅलेंजसाठी मी शशांकला नॉमिनेट करते. हे गाणे मराठी चित्रपट 'सैराट'मधील होते. नंतर 'धडक' चित्रपटात याचे हिंदी व्हर्जन करण्यात आले. आता जान्हवी कपूर करण जोहरच्या 'तख्त' चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत आलिया भट्ट, करीना कपूर खान, रणवीर सिंह, भूमी पेडणेकर आणि अनिल कपूरसारखे स्टार्स दिसणार आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...