आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई श्रीदेवीच्या वाढदिवशी जान्हवी कपूरने शेअर केला हा फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एंटरटेन्मेंट डेस्कः दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची आज 55 वी (13 ऑगस्ट) बर्थ अॅनिव्हर्सरी आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांची थोरली मुलगी जान्हवी कपूरने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यासोबत तीन वर्षांची जान्हवी दिसत आहे. फोटो पोस्ट करुन जान्हवीने त्याच्यासोबत कॅप्शन लिहिलेले नाहीत. 

 

यापूर्वीही आईच्या आठवणीत शेअर केले फोटोज... 
- श्रीदेवी यांचे याचवर्षी 24 फेब्रुवारी रोजी दुबईत निधन झाले होते. त्यांच्या निधनाच्या काही दिवसांनी जान्हवीने तिचा 21 वा वाढदिवस साजरा केला होता. यावेळी ती अतिशय भावूक झाली होती. वाढदिवसाला जान्हवीने आईच्या नावाने एक मेसेज लिहिला होता. या मेसेजमध्ये जान्हवीने लिहिले होत, 'माझ्या वाढदिवशी मला तुमच्याकडून फक्त एकच गोष्ट हवी आहे आणि ती म्हणजे तुम्ही आपल्या आईवडिलांवर प्रेम करा.' पुढे जान्हवीने लिहिले होते, माझ्या आईच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा. 

- जान्हवीने धर्मा प्रॉडक्शनच्या 'धडक' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ईशान खट्टर मेन लीडमध्ये झळकला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा व्यवसाय केला आहे. आता जान्हवी करण जोहरच्या आगामी 'तख्त' या चित्रपटात झळकणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...