Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Janmashtami 2018 Life Management Lord Krishna

फ्रेंड्स, फॅमिली आणि सोशल लाइफमध्ये कसे राहील बॅलेन्स, शिका भगवान श्रीकृष्णाकडून

रिलिजन डेस्क | Update - Aug 31, 2018, 10:48 AM IST

या वेळी 2 आणि 3 सप्टेंबरला जन्माष्टमी उत्सव साजरा केला जाईल. श्रीकृष्णाचे जीवन आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहे.

 • Janmashtami 2018 Life Management Lord Krishna

  या वेळी 2 आणि 3 सप्टेंबरला जन्माष्टमी उत्सव साजरा केला जाईल. श्रीकृष्णाचे जीवन आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहे. श्रीकृष्णामध्ये असे अनेक गुण होते, जे त्यांना परफेक्ट बनवतात. मैत्री निभावणे असो किंवा दाम्पत्य जीवनात सुख, जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी सामंजस्य कायम ठेवले होते. आज आम्ही तुम्हाला श्रीकृष्णामधील अशाच काही गुणांविषयी सांगत आहोत, या गोष्टींचा अवलंब करून तुम्ही तुमचे जीवन सुखी बनवू शकता....


  1. मैत्री निभावणे
  अर्जुन, सुदामा आणि श्रीदामा हे श्रीकृष्णाचे प्रमुख मित्र होते. जेव्हा-जेव्हा यांच्यावर संकट आले तेव्हा श्रीकृष्णाने सर्वतोपरी यांची मदत केली. आजही श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीचा दाखला दिला जातो.


  2. सुखी दाम्पत्य
  ग्रंथानुसार, श्रीकृष्णाच्या 16108 राण्या होत्या. यामध्ये प्रमुख आठ होत्या. श्रीकृष्णाच्या दाम्पत्य जीवनात तुम्हाला कधीही अशांती दिसून येणार नाही. ते आपल्या प्रत्येक पत्नीला संतुष्ट ठेवत होते ज्यामुळे त्यांच्या संसारात कधीही वाद, कलह नव्हता.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...

 • Janmashtami 2018 Life Management Lord Krishna

  3. नाते निभावणे
  भगवान श्रीकृष्णाने आपले प्रत्येक नाते प्रामाणिकपणे जपले होते. आपले कुटुंबीय आणि इतर लोकांसाठी द्वारका नागरी निर्माण केली होती. आई-वडील, बहीण-भाऊ श्रीकृष्णाने प्रत्येक नात्याची मर्यादा पाळली.

 • Janmashtami 2018 Life Management Lord Krishna

  4. युद्धनीती 
  महाभारत युद्धामध्ये जेव्हा-जेव्हा पांडवांवर एखादे संकट आले, श्रीकृष्णाने आपल्या युद्धनीतीने त्यावर मार्ग दाखवला. भीष्म, द्रोणाचार्य इ. अनेक महारथींच्या वधाचा मार्ग श्रीकृष्णाने पांडवांना दाखवला. संकट कितीही मोठे असले तरी धर्य आणि समजूतदारपणे विचार करून त्यावर मार्ग काढणे शक्य आहे.

Trending