Home | Jeevan Mantra | Dharm | Janmashtami 2018 Worship Method and Auspicious Time

जन्माष्टमीचे शुभ मुहूर्त, या सोप्या विधीनुसार करावी भगवान श्रीकृष्णाची पूजा

जीवन मंत्र डेस्क | Update - Sep 02, 2018, 12:08 PM IST

या वर्षी 2 आणि 3 सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जाईल.

 • Janmashtami 2018 Worship Method and Auspicious Time

  या वर्षी 2 आणि 3 सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जाईल. भोपाळचे ज्योतिषाचार्य पं. प्रह्लाद पंड्या यांच्यानुसार 2 सप्टेंबरला अष्टमी तिथी रात्री 8.52 पासून आणि रोहिणी नक्षत्र रात्री 08.06 पासून सुरु होईल. या दिवशी शैव संप्रदायाचे लोक जन्माष्टमी साजरी करतील. याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 सप्टेंबरला सूर्योदयापासून रात्री 8 वाजेपर्यंत अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र राहील. उदय तिथी असल्यामुळे वैष्णव संप्रदायाचे लोक या दिवशी श्रीकृष्ण पूजा करतील. पुढील विधीनुसार तुम्ही श्रीकृष्ण पूजा करू शकता...


  व्रत व पूजन विधी -
  जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्म झाल्यानंतर स्नान करून पांढरे वस्त्र परिधान करा. त्यानंतर देवी-देवतांना नमस्कार करून पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसा आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताचा संकल्प घ्या. ( ज्या प्रकारचे व्रत करण्याची इच्छा आहे असा संकल्प घ्या. फलाहार किंवा एक वेळचे जेवण असे व्रत करावयाचे असल्यास तसा संकल्प करा.)


  त्यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि माता देवकीची सोने, चांदी, तांब, पितळ, मातीच्या मूर्ती किंवा चित्र पाळण्यात स्थापित करा. श्रीकृष्णाला नवीन वस्त्र अर्पण करा. पाळणा हारफुलांनी सजवा. त्यानंतर श्रीकृष्णाचे पूजन करा. पूजेमध्ये देवकी, वासुदेव, बलदेव, नंद, यशोदा आणि लक्ष्मीच्या नावाचा उच्चार करावा. भगवान श्रीकृष्णाला पुष्पांजली अर्पित करावी.


  मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करावा. सुस्वर आवाजात पाळणा हलवून गाणे म्हणावे. पंचामृतामध्ये तुळशीचे पान टाकून आणि पंचखाद्याचा नैवेद्य दाखवावा. दुसर्या दिवशी नवमीला व्रताचा संकल्प सोडावा.


  2 सप्टेंबरच्या रात्रीचे मुहूर्त
  रात्री 12:07 पासून 12:50 पर्यंत


  3 सप्टेंबरचे मुहूर्त
  सकाळी 06:35 ते 7:35
  सकाळी 09:35 ते 10:40
  दुपारी 02:15 ते 03:20
  संध्याकाळी 03:50 ते 05:50

 • Janmashtami 2018 Worship Method and Auspicious Time

  श्रीकृष्णाची आरती
  ओंवाळूं आरती मदनगोपाळा |
  श्यामसुंदर गळां वैजयंती माळा || धृ॰ ||

  चरणकमल ज्याचे अति सुकुमार |
  ध्वजवज्रांकुश ब्रीदाचे तोडर || १ ||

  ओंवाळूं आरती मदनगोपाळा |
  श्यामसुंदर गळां वैजयंती माळा || धृ॰ ||

  नाभिकमलीं ज्याचें ब्रह्मयाचें स्थान |
  हृदयीं पदक शोभे श्रीवत्सलांछन || २||

  ओंवाळूं आरती मदनगोपाळा |
  श्यामसुंदर गळां वैजयंती माळा || धृ॰ ||

  मुखकमल पाहतां सूर्याचिया कोटी |
  वेधलें मानस हारपली दृष्टी || ३ ||

  ओंवाळूं आरती मदनगोपाळा |
  श्यामसुंदर गळां वैजयंती माळा || धृ॰ ||

  जडित मुगुट ज्याचा दैदीप्यमान |
  तेणें तेजें कोंदले अवघें त्रिभुवन || ४ ||

  ओंवाळूं आरती मदनगोपाळा |
  श्यामसुंदर गळां वैजयंती माळा || धृ॰ ||

  एका जनार्दनीँ देखियलें रूप |
  रूप पाहतां जाहलें अवघें तद्रूप || ५ ||

  ओंवाळूं आरती मदनगोपाळा |
  श्यामसुंदर गळां वैजयंती माळा || धृ॰ ||

 • Janmashtami 2018 Worship Method and Auspicious Time

  भगवान शंकराचार्य यांनी स्वत भगवान श्रीविष्णू यांचे दोन प्रमुख अवतार -श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या अद्भुत स्वरूपाला अच्युताष्टक रुपात प्रकट केले आहे. यामध्ये भगवान विष्णू तसेच श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या लीलांचे स्मरण मन-मस्तिष्कला अंतहीन शांती, सुख प्रदान करणारे आहे.

  अच्युताष्टक
  अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम्
  श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे ।1।
  अच्युतं केशवं सत्यभामाधवं माधवं श्रीधरं राधिकाराधितम्
  इन्दिरामन्दिरं चेतसा सुन्दरं देवकीनन्दनं नन्दनं संदधे ।2।
  विष्णवे जिष्णवे शङ्खिने चक्रिणे रुक्मिनीरागिणे जानकीजानये
  वल्लवीवल्लभायाऽर्चितायात्मने कंसविध्वंसिने वंशिने ते नम: ।3।
  कृष्ण गोविन्द हे राम नारायण श्रीपते वासुदेवाजित श्रीनिधे
  अच्युतानन्त हे माधवाधोक्षज द्वारकानायक द्रौपदीरक्षक ।4।
  राक्षसक्षोभित: सीतया शोभितो दण्डकारण्यभूपुण्यताकारण:
  लक्ष्मणेनान्वितो वानरै: सेवितोऽगस्त्यसंपूजितो राघव: पातु माम् ।5।
  धेनुकारिष्टकोऽनिष्टकृद्द्वेषिणां केशिहा कंसहृद्वंशिकावादक:
  पूतनाकोपक: सूरजाखेलनो बालगोपालक: पातु माम् सर्वदा ।6।
  विद्युदुद्धयोतवानप्रस्फुरद्वाससं प्रावृडम्भोदवत्प्रोल्लसद्विग्रहम्
  वन्यया मालया शोभितोर:स्थलं लोहितांघ्रिद्वयं वारिजाक्षं भजे ।7।
  कुञ्चितै: कुन्तलैभ्र्राजमानाननं रत्नमौलिं लसत् कुण्डलं गण्डयो:
  हारकेयूरकं कङ्कणप्रोज्ज्वलं किङ्किणीमञ्जुलं श्यामलं तं भजे ।8।
  अच्युतस्याष्टकं य: पठेदिष्टदं प्रेमत: प्रत्यहं पुरुष: सस्पृहम्
  वृत्तत: सुंदरं कर्तृ विश्वंभरं तस्य वश्यो हरिर्जायते सत्वरम् ।9।

Trending